rashifal-2026

कांदा उत्पादकांना मोठा दिलासा, भाव वाढले

Webdunia
परराज्यातून कांद्याची अचानक मागणी वाढल्याने मंगळवारच्या तुलनेत ११०० रुपयांची दोन दिवसात लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती मोठी वाढ झाल्याने कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे .जास्तीत जास्त २६५० ,सरासरी २३०० रुपये तर कमीत कमी ८००  रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला.
 
कांदा हा भारतातील बहुतांश नागरिकांच्या रोजच्या आहारातील महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे साहजिकच तो लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. गरीब असो किंवा श्रीमंत असो कांदा हा प्रत्येक घरात वापरला जातो.त्यामुळे कांद्याच्या भावात वाढ झाली की सरकारला घामच फूटतो. लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याच्या दराने चांगली उसळी घेतली असून आज उन्हाळ  कांद्याला जास्तीत जास्त २६३१ रुपये भाव जाहिर झाला.
 
सध्या बाजारात येणारा कांदा मार्च महिन्यापासून चाळीत साठवलेला आहे. तो बराच काळ साठवलेला असल्याने कांद्याचे वजन घटल्याने मिळणाऱ्या भावातून शेतकरी वर्गाचा झालेला खर्च आणि तोटा आत कुठे तरी निघण्यास सुरुवात झाल्याचे शेतकरी बोलत आहे .त्यामुळे कांद्याचे दर पाडण्यासाठी शासनाने आयात करणे, निर्यातबंदी करणे असे न करता जे काही शेतकऱ्यांना मिळत आहे ते मिळू द्यावे अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषाला बळी पडावे लागेल अशी विनंतीही बाजार समितीने केली आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

विमान वाहतूक मंत्र्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून अपघाताच्या चौकशीत सहकार्य मागितले

Budget 2026-27: पेट्रोल आणि डिझेलवर जीएसटी येईल का? असे झाले तर किंमतींमध्ये लक्षणीय घट होईल

LIVE: सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या नवीन उपमुख्यमंत्री होतील का?

राज्यात 3 दिवस शाळा बंद राहणार का?

IND vs PAK: भारत विरुद्ध पाकिस्तान सामना या दिवशी खेळला जाईल

पुढील लेख
Show comments