Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मोदी सरकारच्या नोटाबंदीमुळे येस बँक बुडाली : चिदम्बरम

Webdunia
शनिवार, 7 मार्च 2020 (10:58 IST)
दिवाळखोरीत निघालेल्या येस बँकेच्यामुद्द्यावर माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदम्बरम यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. वित्तीय संस्थांवर सरकारने नियंत्रण मिळवल्याचा हा परिणाम आहे. नोटाबंदीमुळे येस बँक बुडाली, असा घणाघात चिदम्बरम यांनी केला. भाजप सरकारने गेल्या 6 वर्षांत वित्तीय संस्थांवर नियंत्रण आणि अनियंत्रित करण्याचे धोरण अवलंबले. यातून त्यांची क्षमता सिद्ध होते. आधी पीएमसी बँक आणि आता येस बँक बुडाली. याबाबत सरकारला कुठलीही चिंता नाही. सरकार जबाबदारी झटकतेय का? आता कुठल्या बँकेचा नंबर आहे?, असा प्रश्न चिदम्बरम यांनी केला. 
 
आता एसबीआय येस बँक खरेदी करणार आहे. पण एसबीआयनेच का येस बँक खरेदी  करावी? एसबीआयने एक रुपयात येस बँकेची कर्जांची पुस्तिका घ्यावी आणि ते कर्ज वसूल करावे. यासोबतच ठेवीदारांचे पैसे सुरक्षित आहेत, ते परत दिले जातील, असा विश्वास निर्माण करावा, असे चिदम्बरम यांनी   ट्विटमध्ये म्हटले आहे. 
 
ढासळत अर्थव्वस्थेला चिदम्बरच जबाबदार 
समाजवादी पक्षाचे माजी नेते अमरसिंह यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. देशाच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेला पी. चिदम्बरम जबाबदार असल्याचा आरोप अमरसिंह यांनी केला आहे. राहुल गांधी व्हिडिओकॉनचे वेणुगोपाल धूत, रिलायन्सचे अनिल अंबानी ज्यांना तुम्ही पंतप्रधान मोदींचे मित्र समजता ते पी. चिदम्बरम यांचे सर्वाधिक जवळचे मित्र आहेत. याचे ठोस पुरावे माझ्याकडे आहेत. मागाल तेव्हा हे पुरावे दाखवू शकतो, असे अमरसिंह म्हणाले. याशिवाय भूषण स्टील, दिवान हाउसिंग आणि इतर कॉर्पोरेट बँका यांना मोठ्या प्रमाणावर निधी पुरवला गेला. आता त्यांच्या अनुत्पादित मालमत्तांमध्ये अब्जावधींची वाढ झाली आहे, असे अमरसिंह म्हणाले. 
 
चिदम्बरम यांनी अर्थमंत्री असताना वारेमाप पैसा वाटला, असा की त्यांची वडिलोपार्जित संपत्ती आहे. देशाची अर्थव्यवस्था ढासळण्यामागे लुंगीवाले आणि भ्रष्टाचारी चिदम्बरम आहेत, अशी टीकाही अमरसिंहांनी केली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: रामदास आठवलेंनी राज्याच्या पुढील मुख्यमंत्र्यांबाबत मोठे वक्तव्य केले

कन्नौजमध्ये लखनौ-आग्रा एक्सप्रेसवेवर भीषण अपघात, 5 डॉक्टरांचा मृत्यू

यवतमाळमध्ये शिक्षकाविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

पुण्यात 15 वर्षाच्या मुलाची आत्महत्या

महाराष्ट्राचे राजकारण सोडणार एकनाथ शिंदे! रामदास आठवलेंच्या वक्तव्याचा अर्थ काय?

पुढील लेख
Show comments