Marathi Biodata Maker

PNB खातेधारक 1 एप्रिलपासून करु शकणार नाही ट्रांजेक्शन, जर हे केले नाही

Webdunia
सोमवार, 25 जानेवारी 2021 (12:43 IST)
देशातील सर्वात दुसरी मोठी शासकीय बँक पंजाब नेशनल बँकेने आपल्या खातेधारकांना सतर्क केले आहे. बँकेने आपल्या सर्व खातेधारकांना 31 मार्च 2021 पर्यंत जुन्या आईएफएससी (IFSC) आणि एमआईसीआर (MICR) कोड आणि जुन्या चेकबुक बदलवण्याची अपील केली आहे. असे न केल्यास ग्राहक 1 एप्रिल 2021 पासून आपल्या बँक खात्यातून देण-घेण करु शकणार नाही.
 
पंजाब नेशनल बँकेने आपल्या ग्राहकांना ट्विट करत ही माहिती पुरवली आहे. बँकेने आपल्या ग्राहकांना 31 मार्च पर्यंत आपल्या जुन्या IFSC आणि MICR Code बदलण्यास सांगितले आहे. हे जुने कोड 1 एप्रिल पासून बदलले जातील. अर्थात 31 मार्च 2021 नंतर हे जुने कोड कामास येणार नाही. म्हणजेच 1 एप्रिलपासून ग्राहकांना व्यवहार करण्यासाठी नवीन कोडची आवश्यकता भासेल. बँकेने ट्वीट करुन चेक आणि IFSC/MICR code बद्दल महत्त्वाची माहिती शेअर  केली आहे.
 
उल्लेखनीय आहे की ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (oriental bank of commerce) आणि युनाइटेड बँक ऑफ इंडिया (united bank of india) चे विलिनीकरण पंजाब नेशनल बँकेत झालेले आहेत. आता या दोन्ही बँकांचे ग्राहक पीएनबी चे ग्राहक झाले आहेत. आता या ग्राहकांना देण-घेण यासाठी बँकेकडून आपलं नवीन चेकबुक आणि आईएफएससी किंवा एमआईसीआर कोड घ्यावं लागेल. ग्राहक टोल फ्री नंबर 18001802222/18001032222 वर फोन करुन अधिक माहिती मिळवू शकतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

LIVE: मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून सर्व खाते काढून घेण्यात आले

मुंबईच्या बेलापूर मेट्रो स्टेशनवर भीक मागणाऱ्या वृद्ध महिलेने दिवंगत क्रिकेटपटू सलीम दुर्राणी यांची पत्नी असल्याचा केला दावा

म्यानमारमध्ये पुन्हा एकदा ४.४ तीव्रतेचा भूकंप

Minority Rights Day in India 2025 भारतातील अल्पसंख्याक हक्क दिन

International Migrants Day 2025 आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन

पुढील लेख
Show comments