Festival Posters

पोस्टाकडून व्याजदर जाहीर

Webdunia
शनिवार, 5 जानेवारी 2019 (09:38 IST)
चालू आर्थिक वर्षाच्या अंतिम तिमाहीसाठीचे व्याजदर पोस्टाकडून जाहीर करण्यात आले आहेत. ३१ डिसेंबर २०१८ रोजी केंद्रीय वित्त मंत्रालयाने जाहीर केलेल्या आदेशांनुसार, छोट्या गुंतवणुकीवरील व्याजदरांमध्ये बदल करण्यात आले आहेत. नव्या बदलानुसार पोस्टाकडून एक वर्षांसाठीच्या मुदत ठेवीसाठी ७ टक्के व्याजदर जाहीर करण्यात आले आहे. अर्थात हे फक्त मुदत ठेवीच्या एक जानेवारी ते ३१ मार्च २०१९ या तिमाहीसाठीच लागू असेल. याआधीच्या तिमाहीसाठी हेच व्याजदर ६.९ टक्के इतके होते. तीन वर्षांसाठीच्या मुदत ठेवींवरील व्याजदर ७.२ टक्क्यांवरून ७ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहे. पोस्टाच्या इतर सर्व योजनांवरील व्याजदरामध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाही. याचाच अर्थ या योजनांवरील व्याजदर मागील तिमाही इतकेच कायम राहणार आहे. 
 
पोस्टाकडे एकूण १२ प्रकारची बचत खाती आहेत. त्यामध्ये बचत खाते, एका वर्षांची मुदत ठेव, २ वर्षांची मुदत ठेव, ३ वर्षांची मुदत ठेव, ५ वर्षांची मुदत ठेव, पाच वर्षांसाठीचे रिकरिंग खाते, ५ वर्षांसाठीचे ज्येष्ठ नागरिक बचत खाते, ५ वर्षांसाठीचे मासिक उत्पन्न खाते, ५ वर्षांसाठीचे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खाते, किसान विकास पत्र आणि सुकन्या समृद्धी योजना यांचा समावेश होतो. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

IPL 2026: दिल्ली कॅपिटल्स खेळाडूच्या चेहऱ्यावर चेंडू लागला, रुग्णालयात दाखल

RCB vs GT: चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीचा या हंगामातील चौथा विजय

स्पॅनिश टेनिस सुपरस्टार कार्लोस अल्काराझने फ्रेंच ओपनमधून माघार घेतली

'आप'मधून भाजपमध्ये गेलेल्या राज्यसभा खासदारांवर मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया

Maharashtra Medical Council Election: एमएमसी नऊ सदस्यांच्या निवडणुकीसाठी २६ एप्रिल रोजी मतदान होणार

पुढील लेख
Show comments