देशात हाय स्पीड 4 जी डाउनलोड स्पीड प्रदान करण्याच्या बाबतीत रिलायन्स जिओ सर्वात पुढे राहिली. मार्चमध्ये जिओची सरासरी डाउनलोड स्पीड 22.2 एमबीपीएस (मेगाबाइट पर सेकंद) राहिली. फेब्रुवारी महिन्यात त्याची स्पीड 20.9 एमबीपीएस होती. टेलिकॉम रेग्युलेटरी ट्रायच्या डेटाच्या मते अपलोड स्पीडच्या बाबतीत व्होडाफोनने पुन्हा एकदा टॉप केलं आहे. त्याची सरासरी अपलोड गती 6.0 एमबीपीएस नोंदवली गेली आहे.
या आकडेवारीनुसार भारती एअरटेलची डाउनलोड गती फेब्रुवारीमध्ये 9.4 एमबीपीएसवरून मार्चमध्ये 9.3 एमबीपीएसवर घसरली. हा सतत दुसरा महिना आहे, जेव्हा एअरटेलची 4 जी डाउनलोड गती कमी झाली आहे. व्होडाफोन नेटवर्कची सरासरी 4 जी डाउनलोड गती मार्चमध्ये, साधारणपणे सुधारून 7.0 एमबीपीएस झाली आहे. फेब्रुवारीमध्ये ती 6.8 एमबीपीएस होती. आयडियाची 4 जी डाउनलोड गती फेब्रुवारीमध्ये 5.7 एमबीपीएसवरून मार्चमध्ये 5.6 एमबीपीएसवर सरकली, त्याचवेळी अपलोड गतीच्या बाबतीत व्होडाफोन पुन्हा एकदा टॉपवर राहिला.
व्होडाफोनची 4 जी अपलोड स्पीड मार्च महिन्यात 6.0 एमबीपीएस नोंदवण्यात आले आहे. फेब्रुवारीमध्येही त्याची अपलोड स्पीड फक्त 6.0 एमबीपीएस होती. आयडिया आणि एअरटेल नेटवर्कच्या सरासरी 4 जी अपलोड गतीमध्ये किंचित घट झाली. मार्चमध्ये आयडियाची 4 जी अपलोड गती 5.5 एमबीपीएस आणि एअरटेलची 3.6 एमबीपीएस होती. मार्च महिन्यात जिओची 4 जी अपलोड गती 4.6 एमबीपीएस नोंदवण्यात आली आहे, जी गेल्या महिन्यात 4.5 एमबीपीएस होती. ट्रायद्वारे सरासरी गती डेटाच्या आधारावर मोजली जाते. हे आकडे रिअल-टाइम आधारावर ट्रायच्या माईस्पिड ऍप्लिकेशनच्या साहाय्याने एकत्र केला जातो.
हे महत्त्वाचे आहे की व्होडाफोन आणि आयडिया विलीन झाले आहे आणि आता ते व्होडाफोन आयडिया म्हणून काम करीत आहे पण ट्रायने दोन्ही नेटवर्क्सची डाउनलोड, अपलोड स्पीड वेगळी-वेगळी दर्शविले आहे.