Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Personal Gold Loan घेण्याचा विचार करत असाल तर नक्की वाचा

Webdunia
मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021 (12:15 IST)
आपल्या महत्त्वाच्या गरजेसाठी तातडीनं पैशांची उभे करण्याची गरज भासत असेल तर गोल्ड लोन घेणे अधिक सोयीस्कर असतं कारण गोल्ड लोनचा व्याजदर इतरांपेक्षा कमी असतो आणि रीफंडसाठी चांगले पर्याय उपलब्ध असतात. त्यातच देशातील सर्वात मोठी स्टेट बॅंक ऑफ इंडिया ट्वीट करुन ग्राहकांना ही सुविधा घेण्याबद्दल सांगितले आहे. 
 
स्टेट बॅंक ऑफ इंडिया बँकेत वैयक्तिक गोल्ड लोनची सुविधा दिली जात असून या माध्यमातून 20 लाखांपर्यंत कर्ज मिळू शकतं. एसबीआयकडून गोल्ड लोन घेणार्‍या ग्राहकांना 7.50 टक्के व्याजदरासह प्रक्रिया निशुल्क सारख्या योजनांचा लाभ मिळत असल्याची माहिती एसबीआयने ट्विटरद्वारे दिली आहे. 
 
कमीत कमी डॉक्यूमेंट्स आणि कमी व्याजदराने सोनं तारण ठेवून एसबीआय गोल्ड लोनचा लाभ घेता येऊ शकतो.
 
प्रक्रिया आणि पात्रता जाणून घ्या
 
वय – किमान 18 वर्ष
नोकरी किंवा व्यवसायद्वारे उत्पन्न असलेली व्यक्ती
किमान ते कमाल कर्ज रक्कम – 20 हजार रुपये ते 50 लाख रुपये
गोल्ड लोन आणि लिक्विड गोल्ड लोन वर 25 टक्के, तर बुलेट रिपेमेंट गोल्ड लोन वर 35 टक्के मार्जिन.
सोन्याच्या दागिन्यांची गुणवत्ता आणि प्रमाणिकरण तपासलं जातं.
प्रोसेसिंग फी म्हणून कर्जाच्या रकमेपैकी 0.25 टक्के जीएसटी किमान 250 रुपये. योनोच्या माध्यमातून अर्ज दाखल केल्यास जीएसटी लागू नाही.
एमसीएलआर 1 वर्षापेक्षा अधिक कोणत्याही कर्ज रकमेसाठी व्याज दर 0.50 टक्के.
सोने मुल्यांकनाचे शुल्क अर्जदाराकडून आकारले जातं.
गोल्ड लोन आणि लिक्विड गोल्ड लोन रिपेमेंट कालावधी 36 महिने असून बुलेट रिपेमेंट गोल्ड लोन रिपेमेंट कालावधी 12 महिने इतका आहे.
 
गोल्ड लोनसाठी आवश्यक डॉक्यूमेंट्स
दोन फोटोग्राफ
ओळखीचा पुरावा
एड्रेस प्रूफ
अशिक्षित कर्जदार असल्यास साक्षीदाराचे पत्र असणे आवश्यक आहे.
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments