Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

GSTचा प्रभाव : टाटाच्या गाड्या 12 टक्के, रेनॉ च्या 7% टक्के स्वस्त

Webdunia
गुरूवार, 6 जुलै 2017 (09:15 IST)
तुम्ही टाटा कंपनीची गाडी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. टाटा मोटर्सने आपल्या गाड्यांच्या किंमती तब्बल 12 टक्‍क्‍यांपर्यंत घटवल्या आहेत.
 
टाटाच्या कारमध्ये 3 हजार 300 पासून ते 2 लाख 17 हजारांपर्यंत घट करण्यात आली आहे. गाड्यांचे मॉडेल्स आणि पेट्रोल-डिझेल प्रकारानुसार ही सूट दिली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 1 जुलैपासून देशात जीएसटी ही नवी करप्रणाली लागू झाली. त्यानंतर सर्वच क्षेत्रावर या करप्रणालीचा परिणाम पाहायला मिळाला. नव्या करांमुळे अनेक कंपन्यांनी आपापल्या वस्तूंचे दर कमी-जास्त केले. ऑटोमोबाईल क्षेत्रात मारुती सुझुकी, फोर्ड आणि होंडा या कंपन्यांनंतर आता टाटा मोटर्सनेही आपल्या गाड्यांच्या किंमती घटवल्या आहेत. जून 2017 मध्ये टाटा मोटर्सच्या गाड्यांच्या विक्रीत 5 टक्‍क्‍यांनी घट झाली होती. त्यामुळे आता गाड्यांच्या किंमती कमी झाल्यानंतर विक्रीत वाढ होण्याची आशा कंपनीकडून व्यक्त केली जात आहे.

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments