Dharma Sangrah

टाटा समूहाचे अध्यक्ष मिस्त्री यांना हटवले

Webdunia
मुंबई- टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून सोमवारी सायरस मिस्त्री यांना हटविण्यात आले. रतन टाटा यांची तात्पुरते अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 2012 मध्ये सायरस मिस्त्री यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली होती.
 
चार महिन्यात टाटा समूहाचा नवा अध्यक्ष निवडण्यात येणार आहे. त्यासाठी एका समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. ही समिती नव्या अध्यक्षाचा शोध घेणार आहे. रतन टाटा 28 डिसेंबर 2012 रोजी टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून निवृत्त झाले होते. त्यांच्या जागी संचालक मंडळाने सायरस मिस्त्री यांची नियुक्ती केली होती. 2006 पासून सायरस मिस्त्री टाटा सन्सचे संचालक होते. नोव्हेंबर 2012 मध्ये ते या कंपनीचे उपाध्यक्ष झाले होते. काही दिवसांपूर्वीच सायरस मिस्त्री यांनी टाटा समूहातील कर्मचार्‍यांशी वेबसाईटच्या माध्यमातून संवाद साधला होता. समूहाच्या खडतर काळात चपळता आणि धिटाई अंगी बाणवणे आवश्यक असल्याचे आवाहन त्यांनी कर्मचार्‍यांना केले होते.
सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

हर्षा ऋचरिया हर्षानंद गिरी बनल्या, उज्जैनमध्ये संन्यास घेतला, संतांचा विरोध

LIVE: महाराष्ट्र सरकारने आयपीएस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावरील बदल्या आणि नियुक्तीचे आदेश जारी केले

महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य! उपजीविका जाणार का? काय म्हणाले मंत्री सरनाईक

PM Kisan Yojana : 23वा हप्ता लवकरच

मुंबईत शाळा बेकायदेशीरपणे चालवल्या जात आहे," किरीट सोमैया यांनी गंभीर आरोप केले

पुढील लेख
Show comments