Festival Posters

रेशन दुकानात मिळणार होत्या या वस्तू, पण सध्या तरी असे चिन्ह नाही

Webdunia
सोमवार, 14 मार्च 2022 (16:23 IST)
राज्यातील सरकारी रेशन दुकानांमध्ये ग्राहकांना आता आंघोळीसाठी आणि कपडे धुण्यासाठी साबण, हँडवॉश, डिटर्जंट पावडर, शाम्पू, कॉफी आणि चहापत्तनी खरेदी करता येणार आहेत. साबण, हँडवॉश, लॉन्ड्री पावडर, शाम्पू, कॉफी यासारख्या उत्पादनांची विक्री करण्यासाठी राज्य सरकारने रेशन दुकानांना मान्यता दिली आहे. राज्य सरकारच्या अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाने याबाबतचा आदेश जारी केला होता.
 
त्यानुसार शासनाने रेशन दुकानांना सदर वस्तू तात्पुरत्या स्वरूपात ठेवण्यास परवानगी दिली आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या स्वरूपामध्ये वेळोवेळी होणारे बदल लक्षात घेऊन त्यात बदल करण्यात येणार आहेत. रेशन दुकानांना विक्री आणि दुकानांपर्यंत पोहोचून मिळणाऱ्या कमिशनबाबत थेट संबंधित वितरक कंपनीशी संपर्क साधावा लागेल, असे सरकारने स्पष्ट केले आहे. हा व्यवहार संबंधित कंपनी आणि त्यांचे घाऊक आणि किरकोळ वितरक आणि रेशन दुकान यांच्यात असेल. यामध्ये सरकारचा कोणताही सहभाग आणि हस्तक्षेप असणार नाही.
 
परंतु या आदेशाची अद्याप स्पष्टता नसल्याने रेशन दुकनांमधून अजूनही चहा, कॉफी मिळत नसल्याचे चित्र आहे. नाशिक येथे अजूनही याबाबतची अंमलबजावणी झाली नसल्याचे दिसते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

ठाण्यातील ज्येष्ठ नागरिकाला व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे 1.06 कोटी रुपयांची फसवणूक

LIVE: पुण्यातील हवा विषारी झाली, एक्यूआय 242 वर पोहोचला

पुण्यातील हवा विषारी झाली, एक्यूआय 242 वर पोहोचला

इंडिगो संकटावर भारतीय रेल्वेची मोठी घोषणा, अडकलेल्या प्रवाशांसाठी 84 विशेष गाड्या चालवणार

नागरी उड्डाण मंत्रालयाने प्रभावित मार्गांसाठी कमाल भाडे मर्यादा निश्चित केली

पुढील लेख
Show comments