Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शेतमाल तारण योजना

Webdunia
सोमवार, 24 एप्रिल 2017 (15:55 IST)
तूर डाळ खरेदी आता अनेक ठिकाणी बंद झाली आहे. त्यामुळे शेतकरी चिडला आहे. त्यावर थोडा उपाय म्हणून आता  तूर न देता शेतमाल तारण कर्ज योजनेचा लाभ घेण्याचा सल्ला पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिला आहे.
 

जवळपास 316 तूर खरेदी केंद्र आहेत. सद्यस्थितीत प्रत्येक केंद्राबाहेर अंदाजे 20 हजार क्विंटल तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांनी आणलेली आहे. अजूनही तुरीची आवक सुरुच आहे. त्यामुळे लवकरात लवकर तूर खरेदी सुरु करावी, असे पत्र  सरकारला पाठवले आहेत. मात्र ज्यांनी आधी नोंदणी केली त्यांचा माल विकत घेवू असे सरकार म्हणत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतकरी उद्रेक झाला आहे. 
 

यामध्ये शेतमाल तारण ठेवताना  योजनेअंतर्गत फक्त उत्पादक शेतकऱ्यांचाच शेतमाल स्वीकारला जातो. कोणत्याही व्यापारी अथवा शेतकरी सोडून कोणीही  शेतमाल अंतर्गत स्वीकारला जात नाही. तारण ठेवलेल्या शेतमालाची किंमत ही त्या दिवसाचे बाजारभाव किंवा शासनाने जाहीर केलेली खरेदी किंमत यापैकी जी कमी असेल ती ठरवण्यात येते.तारण कर्जाची मुदत 6 महिने (180 दिवस) आहे. तारण कर्जाचा व्याजाचा दर 6 टक्के आहे. त्यामुळे आता शेतकरी कोणत्या पद्धतीने कर्ज घेतो आणि कश्या प्रकारे घेतो हे पाहावे लागेल.

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments