Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पी एम सी बँकेवर नेमके काय आहेत बंधने, ३५ A अंतर्गत कारवाई म्हणजे काय ? जाणून घ्या

Webdunia
गुरूवार, 26 सप्टेंबर 2019 (09:51 IST)
पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेवर (पीएमसी) आरबीआयने निर्बंध घातले आणि ही बातमी वाऱ्यासारखी पसरली, त्यामुळे ग्राहक हैराण झाले आणि बँकेत त्यांनी धाव घेत आपले पैसे काढण्याचे प्रयत्न सुरु केले मात्र बँकेवर काही निर्बंध आल्याने ग्राहकांना फक्त एक हजार रुपयेच काढण्याची मुभा देण्यात आली आहे, बँकिंग नियामक कायदा 1949 मधील कलम 35A अंतर्गत बँकेने ही कारवाई केली असून, कारवाईनंतर बँकेसमोर ग्राहकांनी पैसे मिळत नसल्याने एकच गोंधळ केला. मात्र नेमके काय बंधने आहेत ते जाणून घेऊयात - 
 
बँकांची बँक असलेल्या आरबीआयच्या निर्बंधामुळे एका खातेधारकाला त्याच्या खात्यातून फक्त 1 हजार रुपयेच काढता येतील, म्हणजे 6 महिन्यात केवळ 6 हजार रुपयेच काढता येणार आहेत. तर खात्यात कितीही रक्कम असली तरी महिन्यातून केवळ 1 हजार रुपयेच काढता येणार आहेत. सोबतच 
खातेदारांवर देखील निर्बंध आहेत, जर तुम्ही पीएमसी बँकेचं कर्ज घेतलं असेल, तर तुमच्या हप्त्याची रक्कम खात्यात वळती होईल, तर कर्ज फेडण्यासाठी कर्जदार त्यांच्या ठेवींचा वापर करू शकतात.
बँकेवर कोणकोणते निर्बंध जाणून घेऊ ?
रिझर्व्ह बँकेच्या मान्यतेशिवाय कोणतेही नवे कर्ज देता येणार नाही, जुन्या कर्जांचे नूतनीकरण करता येणार नाही,बँकेला कोणतीही गुंतवणूक करता येणार नाही ,नव्या ठेवी स्वीकारता येणार नाहीत ,बँकेची देणी फेडण्यासाठी देयक अदा करता येणार नाही, कर्मचाऱ्यांचे पगार, जागेचे भाडे, कर, विज बिल, प्रिंटिंग, स्टेशनरी, कायदेशीर खर्च यासाठी खर्च करता येईल सोबतच वकिलांना प्रत्येक खटल्यामध्ये पाच हजारापेक्षा अधिक रक्कम देता येणार नाही

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ramayan : हनुमानजी आपली शक्ती का विसरले?

Kamada Ekadashi 2025: ८ एप्रिल रोजी कामदा एकादशी, तिथी मुहूर्त आणि व्रतकथा

आंघोळीच्या पाण्यात या 4 गोष्टी मिसळा, भरपूर पैसा मिळेल, प्रगती होईल !

उन्हाळ्यात दररोज एक कच्चा कांदा खा, उष्माघातापासून बचाव होईल, इतरही अनेक फायदे

गुलकंद करंजी रेसिपी

सर्व पहा

नवीन

सुप्रिया सुळे तनिषाच्या कुटुंबाला भेटणार,या प्रकरणात सुप्रिया सुळे यांनी दिली प्रतिक्रिया

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आणखी एका स्वप्नातील प्रकल्पाचे काम थांबवण्याचे आदेश

कुणाल कामराला मोठा दिलासा, मद्रास उच्च न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामिनाची मुदत वाढवली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत 3 'निर्भया' सायबर लॅबचे उद्घाटन केले

पुण्यात दीड कोटी रुपयांच्या फसवणुकीचा प्रकार, गोखले इन्स्टिट्यूटच्या सचिवाला अटक

पुढील लेख
Show comments