Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हिंडनबर्ग काय आहे आणि त्यांच्या एका रिपोर्टमुळे उद्योगविश्व का हादरून जातं?

Webdunia
रविवार, 11 ऑगस्ट 2024 (15:40 IST)
हिंडनबर्ग रिसर्च’ या अमेरिकन रिसर्च कंपनीने नव्या रिपोर्टमध्ये भारतातील शेअर बाजाराचं नियमन करमाऱ्या ‘सेबी’च्या विद्यमान अध्यक्षा माधबी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांच्यावर आर्थिक अनियमिततेचे आरोप केले आहेत.
 
गेल्या 18 महिन्यांत भारतातील व्यावसायिक आणि वित्तीय बाजारात कथित वित्तीय अनियमिततेबाबत ‘हिंडनबर्गन’ने जारी करण्यात आलेला हा दुसरा रिपोर्ट आहे.
यापूर्वी 2023 साली ‘हिंडनबर्ग’ने उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी समूहावर रिपोर्ट प्रकाशित करून खळबळ उडवली होती.
हे रिपोर्ट प्रकाशित करणारी हिंडनबर्ग रिसर्च ही संस्था नेमकी काय आहे आणि यापूर्वी आलेल्या रिपोर्टमुळे अदानी समूहाला किती नुकसान सहन करावं लागलं होतं, हे आपण या बातमीतून पाहणार आहोत.
हिंडनबर्ग रिसर्च ही अमेरिकन रिसर्च कंपनी आहे. नेट अँडरसन नावाच्या अमेरिकन नागरिकाने या कंपनीची सुरुवात केली आहे.
 
फॉरेन्सिक फायनान्स रिसर्च, वित्तीय अनियमिततांचा तपास आणि विश्लेषण, अनैतिक व्यावसायिक पद्धतीने आणि गुप्त वित्तीय प्रकरणांची चौकशी ही रिसर्च कंपनी करते.
 
'हिंडनबर्ग' कुणाची कंपनी आहे?
या कंपनीचे प्रमुख नेट अँडरसन आहेत. त्यांनी 2017 साली ही कंपनी स्थापन केली. त्यांनी कनेक्टिकट विद्यापीठात आंतरराष्ट्रीय व्यापाराचा अभ्यास केला असून त्यांनी फॅक्ट सेट रिसर्च सिस्टम नावाची डेटा कंपनीत अँडरसन यांनी इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट कंपन्यांबरोबर काम केलं होतं.
 
रॉयटर्सच्या बातमीनुसार त्यांनी इस्रायलमध्ये काही काळ रुग्णवाहिका चालवली होती.
लोक तणावात कसं काम करतात हे आपण रुग्णवाहिका चालवताना अनुभवल्याचं अँडरसन लिंक्डीन प्रोफाइलवर लिहितात. त्यांना वैद्यक कामाचा 400 तासांचा अनुभव आहे असं ते सांगतात.
 
आपले रोल मॉडेल अमेरिकन अकाउंटंट हॅरी मार्कोपोलोस असल्याचे ते म्हणतात.
 
हॅरी यांनी 2008 साली बेनॉर्ड मॅडॉफ पॉन्झी स्कीममधील भ्रष्टाचाराची माहिती उघड केली होती.
 
हॅरी यांच्यावर नेटफ्लिक्सवर द मॉन्स्टर ऑफ वॉल स्ट्रीट ही मालिका प्रसिद्ध झाली होती.
 
हिंडनबर्ग कंपनी स्वत:बद्दल काय सांगते?
गौतम अदानी यांच्या समूहाबद्दल अहवाल देणाऱ्या कंपनीचं हिंडनबर्ग हे नाव जगातील सर्वात मोठ्या उडत्या जहाजाच्या एका घटनेवरुन घेतलंय. या घटनेसंदर्भात आपण पुढे पाहूच.
 
कंपनी म्हणते, या घटनेनुसार आम्हीही शेअर बाजारातील भ्रष्टाचार आणि अनियमितातंवर नजर ठेवतो, त्यांचं सत्य बाहेर आणणं आमचा उद्देश आहे.
 
हिंडनबर्ग घटनेत लोकांचं नुकसान झालं होतं. तसं नुकसान शेअर बाजारात होऊ नये यासाठी लोकांना वाचवण्याचं आपण काम करतो असं कंपनीचं म्हणणं आहे.
कोणताही अहवाल करण्यासाठी ही कंपनी काही मार्गांचा वापर करते :
 
गुंतवणुकीचा निर्णय देण्यासाठी विश्लेषणाचा आधार घेते
तपासणीसाठी संशोधन करतात
सुत्रांद्वारे मिळालेल्या गुप्त माहितीवर संशोधन होतं,
असे तीन मार्ग कंपनीने संकेतस्थळावर सांगितले आहेत.
 
कंपनी तपास कधी करते?
 
लेखा परीक्षणातील अनियमितता असेल तर
महत्त्वाच्या पदांवर 'अयोग्य' व्यक्ती असेल तर
अघोषित देवाणघेवाण व्यवहार झाले असल्यास
कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर व्यवहार, अनैतिक व्यापार झाल्यास
'हिंडनबर्ग' नाव कुठून आलं?
हिंडनबर्ग रिसर्च कंपनीतलं 'हिंडनबर्ग' हे नाव कुठून आलं, हे आपण सविस्तरपणे पाहूया.
 
हिंडनबर्ग जगाच्या इतिहासातलं सर्वांत मोठं उडतं जहाज होतं. उडतं जहाज, म्हणजे शब्दशः उडतं जहाज.
 
तेवढं मोठं, तेवढंच आलिशान, त्यात प्रवास करणाऱ्यांसाठी वेगळ्या केबिन, साग्रसंगीत जेवणाचा डायनिंग हॉल... तात्पर्य पाण्यावर तरंगणारं आलिशान जहाज असायचं, तसं हवेत उडणारं जहाज.
 
हिंडेनबर्गने 1936 साली म्हणजे हा अपघात व्हायच्या आदल्या वर्षी युरोप ते अमेरिका अशा 10 फेऱ्या मारल्या होत्या.
 
1937 चं प्रवासी वेळापत्रक सुरू झालं तसं मार्च महिन्यात ते एअरशिप ब्राझीललाही जाऊन आलं. 3 मे 1937 ला हिंडनबर्ग फ्रँकफर्टहून निघालं आणि 6 मेला सकाळी ते अमेरिकेतल्या लेकहर्स्टला पोचणार होतं.
 
या उडत्या जहाजात एकूण 97 लोक होते. 36 प्रवासी आणि 61 कर्मचारी.
 
ही एअरशिप्स जमिनीवर पूर्णपणे उतरायची नाहीत. तर फ्लाईंग बेसवर असलेल्या मोठ्या मोठ्या उंच खांबावर बांधली जायची.
हवेतून हळूहळू वेग कमी करत एअरशिप्स त्या खांबापर्यंत यायची. अर्थात हे वाटतं तेवढं सोपं नव्हतं. बरोबर योग्य ठिकाणीच एअरशिपचा योग्य तो भाग आला पाहिजे, तरच हे लँडिंग शक्य होतं.
 
अचूक जागा शोधण्याच्या नादात हिंडनबर्ग हवेतल्या हवेत तीनदा फिरलं. पण शेवटी चौथ्यांदा ते योग्य ठिकाणी आलं. संध्याकाळचे साडेसात वाजले होते. लँडिंगची प्रक्रिया सुरू असतानाचा जमिनीवरच्या काही प्रत्यक्षदर्शींना वरच्या भागातून वायूगळती होतेय असं दिसलं.
 
काहींनी म्हटलं की त्यांना निळ्या रंगाची ज्वाला दिसली.
 
काही क्षणातच हिंडनबर्गने पेट घेतला, लाल-पिवळ्या रंगाच्या ज्वाळांचा लोट उठला. हिंडेनबर्गचा स्फोट झाला होता.
 
एअरशिपमध्ये असलेल्या 97 लोकांपैकी 35 आणि जमिनीवरची एक व्यक्ती अशा 36 लोकांची जीव गेला.
 
अनेकांनी पेटत्या एअरशिपमधून उड्या टाकून आपला जीव वाचवला. पण जे वाचले तेही गंभीररित्या भाजले होते.
 
37 सेकंदात हिंडनबर्गचा खेळ संपला होता.
 
अदानींच्या साम्राज्याला दिलेला धक्का
गेल्यावर्षी म्हणजे 24 जानेवारी 2023 रोजी हिंडनबर्ग रिसर्चने अदानी समूहाबाबतचा पहिला रिपोर्ट प्रकाशित केला होता. हा रिपोर्ट आल्यानंतर भारतीय उद्योजक गौतम अदानी यांच्या साम्राज्याला मोठा धक्का बसला होता.
 
या रिपोर्टमध्ये अदानी समूहाबद्दल 88 प्रश्न विचारले होते. मात्र, रिपोर्टमधील सर्व आरोप अदानी समूहाने फेटाळले होते.
या रिपोर्टनंतर शेअर बाजारातही पडझड दिसून आली.
 
रिपोर्टच्या दिवसापर्यंत गौतम अदानी जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या नंबरवर होते. मात्र, हिंडनबर्गच्या रिपोर्टनंतर 10 दिवसांत ते पहिल्या 20 जणांच्या यादीतूनही बाहेर पडले होते. त्यांनी 20 हजार कोटींचा एफपीओ रद्द केला होता
 
Published By- Priya Dixit
 
 
 
 
 
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

मुंबईत भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, तरुणाचा मृत्यू

Gas Cylinder:रेशनकार्ड धारकांना सरकार देत आहे 450 रुपयांना एलपीजी गॅस सिलिंडर

बटाट्यावरून वाद, वृद्ध महिलेवर हल्ला, नागपूरची घटना

दिल्लीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं नाव फायनल, सस्पेन्स आज संपणार?

जाधववाडी येथे ट्रकची दुचाकीला धडक, दोघे ठार

पुढील लेख
Show comments