Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लवकरच येतेय भारताची पहिली सुपरकार

Webdunia
बुधवार, 8 एप्रिल 2015 (11:52 IST)
सुपरकार बनविण्यात आजपर्यंत जर्मनी आणि इटली या देशांचे वर्चस्व असले, तरी भारतातही पहिली सुपरकार लवकरच येत आहे. एम झिरो या नावाने येणारी ही कार मीन मेटल मोटर्स कंपनीकडून बनविली जात आहे. कंपनीचे संस्थापक व संचालक सार्थक पॉल या संदर्भात माहिती देताना म्हणाले की, आम्ही या कारसाठी 4.0 लीटर एएमजी व्ही 8 बायटर्ब इंजिन बसविणार असून त्यासाठी बोलणी सुरू आहेत.

गाडीचा कमाल वेग 320 किमी. असेल आणि 0 ते 100 चा वेग ती 3 सेकंदापेक्षा कमी वेळात गाठू शकणार आहे. ही हायब्रीड सुपरकार आहे आणि त्यात इलेक्ट्रिक मोटरही असेल. कारचे एअरोडायनॅमिक्स उत्तम दर्जाचे असून हायस्पीडलाही ही कार स्थिर राहील. कारसाठी मिश्र धातूची बॉडी बनविली गेली आहे. या कारचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात वापरण्यात आलेले क्रॉस हेअर तंत्रज्ञान. यामुळे कारचा मालकच फक्त कार उघडू शकतो. परिणामी चोरट्यांना ही कार चोरली तरी उघडता येणार नाही.

या कारसाठी चार देशातील चार टीम काम करत आहेत. पोतरुगाल आणि इटली या कारची बॉडी आणि स्टाइलवर काम करत आहेत. इंग्लंड सिम्युलेशन अँनालिसिसवर काम करत आहे, तर भारतीय टीम इंजिन, ट्रान्समिशन, एअरोडायनामिक्स, व्हेईकल डायनामिक्स, इलेक्ट्रॉनिक्स व एनर्जी स्टोरेज यावर काम करत आहे.

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

Show comments