Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

असा साजरा करतात ख्रिसमस

असा साजरा करतात ख्रिसमस
पाश्चिमात्य देशात ख्रिश्चन लोक मोठ्या प्रमाणात आहेत तेथे हा एक मोठा सण आपल्याकडच्या दिवाळीसारखा साजरा केला जातो.
* हा सण १२ दिवस साजरा करतात.
* ह्या दरम्यान बागेत, चर्चमध्ये एकत्र येऊन, मेणबत्त्या लावून ख्रिसमस गीत (कॅरोल) म्हटले जाते.
* २४-२५ डिसेंबरची रात्र ही या सणातील महत्त्वाची असते. कारण त्यावेळी येशू ख्रिस्ताचा जन्म होतो. या दिवशी चर्चमध्ये विशेष प्रार्थनासभा आयोजित केल्या जातात.
* मुलांसाठी २४ डिसेंबरची अर्धी रात्र महत्वाची असते. जेव्हा सांताक्लॉज घराच्या चिमणीच्या (धुराडे) आत घुसून झोपलेल्या मुलांच्या टांगलेल्या मोज्यांत खेळणी टाकतो.
* घरातल्या प्रत्येकासाठी ख्रिसमस ट्री वर काहीतरी गिफ्ट टांगलेले असते. २५ डिसेंबरला उठल्यावर पहिल्यांदा लोक त्या भेटवस्तू बघतात.
* घरातल्या पाळीव प्राण्यांनाही त्यांच्या आवडीच्या भेटवस्तू असतात.
* प्रत्येक रात्री मेजवानी असते. त्यात मुख्य अतिथी म्हणून घरची मोठी माणसे असतात. मित्र आणि आप्तेष्ठ या मेजवानीत सामील होऊन मौजमजा करतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हे 3 काम करताना लाजू नये