Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 15 April 2025
webdunia

ख्रिसमस 2020 विशेष : सांता क्लॉज बद्दल जाणून घेऊ या मनोरंजक माहिती

about Santa Claus
, बुधवार, 23 डिसेंबर 2020 (08:47 IST)
येसू ख्रिस्त यांच्या जन्मदिवस 25 डिसेंबरला ख्रिसमस असे ही म्हणतात. या सणाला सांता क्लॉज नावाचे एक वयोवृद्ध मुलांसाठी भेटवस्तू चॉकलेट आणि अनेक वस्तू आणतात. चला तर मग जाणून घेऊ या सांता क्लॉज बद्दल 25 मनोरंजक माहिती.
 
1 सांता क्लॉजचे रूप पांढरी दाढी, पांढऱ्या बॉर्डरचे लाल कपडे आणि पांढऱ्या बॉर्डरची लाल लांब टोपी डोक्यावर घातलेली वडीलधारी आहे.
 
2 आख्यायिकांनुसार सांता ख्रिसमसच्या दिवशी थेट स्वर्गातून जमिनीवर येतात आणि मुलांना चॉकलेट, टॉफी, फळे, खेळणे आणि इतर भेटवस्तू देतात आणि परत स्वर्गात निघून जातात.
 
3 परंपरेनुसार मुलं सांताला 'ख्रिसमस फादर' देखील म्हणतात. ख्रिश्चन समुदायाच्या मुलांमध्ये हा विश्वास पसरला आहे की खरंच सांता नावाचे एक देवदूत आहे आणि ते अस्तित्वात आहे.
 
4 बरेच लोक सांताला एक काल्पनिक पात्र मानतात. त्यांचा असा विश्वास आहे की सांता नावाच्या या पात्राला सर्वप्रथम कोको कोला कंपनीने रचले होते कारण त्यांच्या बाटलीच्या रंगाचे कपडे सांता क्लॉजने घातले होते. याचा अर्थ असा आहे की सांता क्लॉजला ग्राहकवादाने लोकप्रिय केले. या पूर्वी त्यांना कोणीही ओळखत नव्हते. आजच्या आधुनिक काळातील सांताचे अस्तित्व 1930 मध्ये आले. हैडन संडब्लोम नावाचा एक कलाकार कोका कोलाच्या जाहिरातीमध्ये सांताच्या रूपात दिसला.

5 बऱ्याच देशांमध्ये सांता क्लॉज तर येशू ख्रिस्तांपेक्षा अधिकच लोकप्रिय होत आहे. ख्रिसमसला आता ख्रिश्चन घरांमध्ये येशू ख्रिस्ताबद्दल कमी तर सांता क्लॉज आणि ख्रिसमस ट्री बद्दल जास्त बोलले जाते.
 
6 कालांतराने प्रत्येक धर्माच्या सणाचे रूप बदलतात. त्यामध्ये नवीन गोष्टी जोडल्या जातात. अशा प्रकारे आता ख्रिसमसच्या दिवशी बरेच लोक सांता क्लॉजचा वेष धरून मुलांना चॉकलेट आणि टॉफी वाटप करतात आणि आता सांता क्लॉज मुलांना पत्र देखील लिहितात.
 
7 तज्ज्ञाच्या मते युरोपचे ओडिन पात्रच सांता क्लॉज आहे. ख्रिश्चन धर्मात यूल नावाच्या सणाला एक डोळा आणि दाढी ठेवलेला वृद्ध ओडिन आपल्या आठ पायाच्या घोड्यावर बसून शिकारीं समवेत जात होता. कदाचित तेच ओडिन आता सांता क्लॉज मध्ये बदलले आहेत.
 
8 सांता क्लॉज एका हिमवर्षावच्या भागात राहतात आणि ते एका चाकविरहित स्लेज मध्ये बसतात ज्यांच्या पुढे दोन रेनडिअर लावलेले असतात जे त्या स्लेजला ओढून घरोघरी नेतात. सांता मुलांना भेटवस्तू देतात. तर येशू तेथे जन्मले जिथे वाळवंटच वाळवंट होत बर्फ नव्हता.
 
9 ओडिनच्या व्यतिरिक्त सांता क्लॉजला बायझेंटाइन साम्राज्याच्या संत निकोलसशी जोडून बघितले जाते. सांता क्लॉज चवथ्या शतकात मायराच्या जवळ एका शहरात जन्मले होते. त्यांचे नाव निकोलस होते. निकोलसला मुलांची आवड होती कोणत्याही सणाला ते आपल्या संपत्तीमधून मुलांसाठी खेळणी विकत घेऊन त्यांच्या घरात खिडक्यांतून फेकायचे. त्यांच्या या कामामुळे त्यांना बिशप बनवले. बिशपच्या रूपाने त्यांची जबाबदारी आणखीन वाढली. हळू-हळू ते उत्तरी युरोप मध्ये प्रख्यात झाले. लोकांनी त्यांना सन्मान देण्यासाठी क्लॉज म्हणू लागले. कॆथॉलिक चर्चने त्यांना संत हा दर्जा दिल्याने त्यांना सांता क्लॉज म्हणत होते जे आजतायगत सांता क्लॉज च्या नावाने प्रख्यात आहे.
 
10 ख्रिसमसच्या दिवशी काही ख्रिश्चन कुटुंबातील मुले रात्रीच्या वेळी घराच्या बाहेर आपले मोजे वाळवतात. त्यामागील कारण असे की सांता क्लॉज रात्री येऊन त्यांच्या मोज्यां मध्ये त्यांच्या आवडीच्या भेटवस्तू देऊन जातील.

11 संत निकोलसच्या स्मृती निमित्त काही ठिकाणी दर वर्षी 6 डिसेंबर रोजी संत निकोलस दिन साजरा केला जातो. या मागील अशी समज आहे की संत निकोलसच्या लोकप्रियते बद्दल संतप्त झालेल्या लोकांनी 6 डिसेंबर रोजी त्यांची हत्या केली.
 
12 तसेच काही विद्वान असेही मानतात की 16 व्या शतकातील फादर क्रिस्मस आणि नीदरलँडच्या सिंटर क्लॉज ह्यालाच सांता क्लॉज मानले जाते. सांता क्लॉज ला सेंट निकोलस, फादर ख्रिसमस, ख्रिस क्रिंगल किंवा सांताच्या नावाने ओळखले जाते. सांताच्या आधुनिक व्यक्तिमत्त्वाच्या जन्म सिंटरक्लॉजच्या डच आकृती वरून झाले आहे. सेंट निकोलस ची वेशभूषा हेगीओग्राफ़िकल कथांमध्ये मिळते. अशाच प्रकाराची एक कहाणी बिझाईंटींन आणि युनानी लोककथां मध्ये प्रचलित आहे. बॅसिल ऑफ केसारिया नावाचे 1 जानेवारीला ग्रीस मध्ये फीस्ट पर्व साजरा केला जातो, या दिवशी भेटवस्तूंची देवाण-घेवाण केली जाते.
 
13 अनेक देशांमध्ये सांता क्लॉज वर आधारित थीम पार्क देखील बनविले आहे.
 
14 असे म्हणतात की आता सांता क्लॉज सह बरेच कथा जोडल्या आहेत. त्यांना मदत करणाऱ्या बुटक्या एल्व्हज च्या कथा देखील सांगितल्या जातात. तारांशी जुडलेल्या कथा आणि जिंगल बेल ची गाणी देखील जोडली आहे. सांताच्या संबंधात एक आणखी लोककथा आहे जे 'सांता क्लॉज इज कमिंग टू टाऊन' या गाण्यात प्रचलित आहे.
 
15 जिंगल बेल च्या गाण्याला ख्रिश्चन धर्मात ख्रिसमस शी जोडले आहेत, पण काही लोक असे देखील मानतात की हे ख्रिसमसचे गाणे नाहीच. हे थॅंक्सगिव्हिंग  गाणे आहेत ज्याला 1850 मध्ये जेम्स पियरपॉन्ट ने वन हॉर्स ओपन स्लेई या शीर्षकाने लिहिले होते.
 
16 सांता क्लॉज आणि त्यांची बायको आणि मुलं ह्यांना घेऊन हॉलिवूड चे काही चित्रपट बनले आहे ज्या मुळे हे पात्र या ख्रिसमस च्या उत्सवाचा एक विशेष भाग बनला आहे. अशा प्रकारे ख्रिसमसच्या सणाशी संबंधित असलेल्या सांता क्लॉज आणि जिंगल ची कहाणी खूपच रंजक आहे.
 
17 सांता क्लॉजचे अस्तित्व आहे किंवा नाही हा संशोधनाचा विषय असू शकतो. पण आता हे पात्र मुलांमध्ये खूप लोकप्रिय झाले आहेत. ख्रिसमसला मुलं येसू ख्रिस्त शी न जुडता स्वतःला सांताक्लॉज शी जोडतात. प्रार्थना करण्याच्या ऐवजी भेटवस्तूंबद्दल अधिक विचार करतात.
 
18 पूर्वी असे होत होते की फक्त एक म्हातारा सांता बनून मुलांना भेटवस्तू वाटायचा नंतर मग शहरात आणि खेड्यात हजारो लोक सांता बनून मुलांना चर्च किंवा बाजारपेठेत भेटवस्तू देऊ लागले. आता तर मुलं देखील सांता क्लॉज बनू लागले आहेत.
 
19 असे म्हणतात की सांता आपल्या बायको आणि मोठ्या कुटूंबासह उत्तरी ध्रुवांवर राहतात. उत्तरी ध्रुव कँनडा, डेनमार्क, फिनलंड, आईसलँड, नार्वे, रशिया, स्वीडन आणि युनाइटेड स्टेट्स सारख्या देशां जवळ आहेत. म्हणून ते घर वर्षभर ख्रिसमस सारखे सजविले असतात.
 
20 असे म्हणतात की सांताचे घर खूप मोठे आहे जे बर्फाने झाकलेले आहे. सांताच्या घरात एक खास ठिकाण आहे ज्याला सांताची डेन किंवा खाजगी जागा असे म्हणतात जिथे सर्व लोक त्यांमध्ये त्यांची पत्नी बरेच एल्व्हस आणि रेनडिअर्स एकत्ररित्या राहतात. असे म्हणतात की तिथे मोठ्या प्रमाणात काल्पनिक बुटके आणि सुमारे 8 ते नऊ उडणारे रेनडिअर राहतात.
 
21 सांताच्या घरात क्राफ्ट कॉटेज नावाची एक जागा आहे जिथे एल्व्हस ग्रीटिंग कार्ड्स, कागदी फुले, सुंदर पर्स, लाकडाची नाव, पुष्प गुच्छे आणि बऱ्याच काही सुंदर वस्तू बनवतात. सांताच्या घरातील दुसऱ्या भागात एक पोस्ट ऑफिस आहे.
 
22 सांताला दरवर्षी मुले लाखो पत्र लिहितात. इतके मोठ्या प्रमाणात पत्र येण्यासाठी त्या टपाल खात्यातील कर्मचाऱ्यांची वेगळी नियुक्ती करावी लागते. कमीत कमी 20 देश असे आहे जिथे डिसेंबरच्या महिन्यात नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते. युरेपियन देशांमध्ये हे पत्र फादर सिमन्स किंवा सेंट निकोलस आणि रुस मध्ये डेड मोरोज च्या नावाने ओळखले जाणारे संताला संबोधित करतात. सांताचा पत्ता म्हणून बऱ्याचदा तपशीलवार माहिती दिलेली असते, तर बऱ्याचदा फक्त टू सांता, नॉर्थपोल लिहिलेले असते. बऱ्याच वेळा पत्रांमध्ये पत्त्याच्या ठिकाणी सांताचे चित्र बनवले असतात.
 
23 बऱ्याच पाश्चात्य देशात असे मानतात की सांता ख्रिसमसच्या एक दिवसा पूर्वी म्हणजे 24 डिसेंबरच्या संध्याकाळी किंवा रात्री उशिरा येऊन त्यांच्या घरात भेटवस्तू देतात. सांता क्लॉज विशेषतः ख्रिसमसला मुलांना खेळणी, आणि भेटवस्तू देण्यासाठीच ते उत्तरी ध्रुवाला येतात आणि उर्वरित वेळ ते लेपलॅन्ड, फिनलंड मध्ये राहतात.

24 सांताच्या रेनडिअरची नावे अशी आहेत -रुडॉल्फ, डॅशर, डान्सर, प्रेन्सर, विक्सन, डेंडर, ब्लिटझन, क्युपिड, आणि कॉमेट. असे म्हणतात की सांता आणि त्यांचे साथीदार आणि मददगार, एल्फीच्या गटाने जादूची चमकदार धूळ रेनडिअर वर टाकली होती. त्यामुळे रेनडिअरला उडणे येऊ लागले. ही जादूची धूळ सांता आता ख्रिसमसच्या रात्रीच वापरतात.

25 जिझस आणि मदर मेरी नंतर संत निकोलसला इतका मान मिळाला. ख्रिसमसचे हे वर्तमान स्वरूप 19 व्या शतकाचीच भेट आहे. शतकाच्या शेवटी टॉम स्मिथ ने आतिषबाजी करण्यास सुरू केले. पहिले ख्रिसमस कार्ड 1844 मध्ये बनले. सांता क्लॉज किंवा ख्रिसमस फादर यांचा प्रथम उल्लेख 1868 च्या एका पत्रिकेत आढळतो. 1821 मध्ये इंग्लंडची महाराणी ने ख्रिसमस ट्री मध्ये देवाची मूर्ती ठेवण्याच्या परंपरेला जन्म दिले.
 
अशा प्रकारे आपण बघितले की सँटा क्लॉज किंवा भारतातील सांता क्लॉज कशा प्रकारे लोकप्रिय झाले आणि काय आहे त्यांचे सत्य. या गोष्टीला नाकारता येऊ शकत नाही की संत निकोलसलाच बहुतेक देशांमध्ये सांता क्लॉजच्या रूपात ओळखले जातात. काहीही असो पण ख्रिसमस ला सांता क्लॉज चे येणंच या उत्सवाचा आनंद द्विगुणित करतो.  
 
संदर्भ : भारत कोष, (इंडिया डिस्कव्हरी) आणि विकिपीडिया सह विविध स्रोतां मधून  संकलित केले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जीवनाला मौल्यवान बनवतात येशू ख्रिस्त यांच्या या 4 गोष्टी