Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ख्रिसमससाठी सजली जगभरातील शहरे

Webdunia
बुधवार, 24 डिसेंबर 2014 (16:52 IST)
डिसेंबर महिन्यात ख्रिस्ती बांधव ख्रिसमस सणाची आतुरतेने वाट पाहत असतात. ख्रिसमसचे स्वागत करण्यासाठी ते आपल्या घरांची साफसफाई, घरांना सजवणे, नवनवीन कपड्यांची खरेदी करणे अशी कामे करताना दिसतात. सध्या बाजारात आपल्याला दुकानांमध्ये वेगवेगळ्या स्वादांचे केक दिसतात. यामध्ये सध्या चॉकलेट केकला जास्त मागणी आहे. काही ख्रिस्ती बांधव केक घरीच बनवतात. आपण दिवाळीत जसा करंजी, चकल्यांचा फराळ बनवतो त्याचप्रमाणे ख्रिस्ती बांधवसुद्धा नाताळमध्ये बिस्किटे, केक असे खाण्यांचे पदार्थ बनवतात. 
 
ख्रिसमस आता एका आठवड्यानंतर लगेचच असल्याने ख्रिस्ती बांधवांनी बाजारात गर्दी करायला सुरुवात केली आहे. बाजारात केकच्या दुकानाबाहेर आता सांताचे स्टॅच्यूही उभारलेले दिसू लागले आहेत. सर्व ख्रिस्ती बांधव ख्रिसमस ट्रीसुद्धा खरेदी करताना दिसत आहेत. 
 
आपापल्या घरामध्ये त्या ट्रीला आणून, त्या ट्रीवर तर सजावट करतातच मात्र त्या ट्रीच्या अवतीभोवती येशूची लहान घरासारखी झोपडीही बनवतात. हे दृश्य बघायला खूप छान वाटते. ख्रिसमसला सर्व ख्रिस्ती बांधव प्रत्येकाच्या घरात मिठाई, केकची देवाणघेवाण करतात. तसेच प्रत्येक ठिकाणी चर्चमध्ये आठवड्यापूर्वी वेगवेगळ्या स्पर्धाचे किंवा मनोरंजनाच्या कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते. बायबल, रंगबेरंगी स्टाल्स, बॉल्स, आर्टिफिशीयल डेकोरेशन ख्रिसमस ट्री आदी गोष्टींना बाजारात जास्त प्रमाणात मागणी आहे. या सर्व गोष्टी १00 रुपयांच्या पुढेच उपलब्ध आहेत. तसेच यामध्ये न्यू इयरच्या पार्टीसाठीही लोकांची शॉपिंग होताना दिसत आहे. या दिवसात पांढर्‍या रंगाच्या पोशाखास जास्त महत्त्व असते त्यामुळे त्यांच्या किमतीतही वाढ झालेली दिसत आहे.

मंगलाष्टक मराठी संपूर्ण Marathi Mangalashtak

शुक्रवारी कोणत्या मंत्राचा जप करावा?

अक्षय्य तृतीयेला तयार होत आहेत सुकर्म योगासह हे 5 शुभ संयोग, या राशीचे जातक ठरतील भाग्यवान

श्री महालक्ष्मी कोल्हापूर

शुक्रवारची आरती.... जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

Show comments