Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘अग्निपंख’ सिनेमाचा टीजर

Webdunia
‘अग्निपंख’या सिनेमाचा टीजर पोस्टर नुकताच फेसबुकवर प्रदर्शित झाला. हॉलीवूडपट वाटावा असा हा पोस्टर मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. फायर ब्रिगेडवर आधारीत बीग बजेट सिनेमावर काम सुरू असल्याची चर्चा गेल्या वर्षभरापासून होती. आता हा पोस्टर पाहून या सिनेमाबद्दलची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. ‘विटीदांडू’ या यशस्वी चित्रपटानंतर दिग्दर्शक गणेश कदम यांचा ‘अग्निपंख’हा ड्रीमप्रोजेक्ट आहे.
 
महाकाय अग्नितांडव असो...भूकंप असो वा महाप्रलय, मनुष्यजीवासह प्राणी-पक्ष्यांचेही जीव वाचविण्याचे कार्य अग्निशमन दल प्रतिकुल परीस्थितीत करत असते. उन, वारा, पाऊस कशाचीही तमा न बाळगता अग्निशामक जवानांची अग्नि आणि जीवसुरक्षेप्रती असलेली निष्ठा वेळोवेळी अधोरेखित झाली आहे. अशा कर्तव्यनिष्ठ अगिनिशमन दलाचा संघर्ष एका जबरदस्त थरारक आणि रोमांचकारी घटनेतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
 
“अग्निशमन दलावरचा हा पहिला भारतीय ॲक्शनपट आहे. भारतातील सर्वोत्कृष्ट सिनेतंत्रज्ञांचा सहभाग हि या चित्रपटाची जमेची बाजू आहे. त्यामुळे ‘अग्निपंख’ मराठी प्रेक्षकांसाठी व्हीज्युअल ट्रीट असणार आहे.” असा विश्वास दिग्दर्शक गणेश कदम यांनी व्यक्त केला.
 
“अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि ग्राफिक्स मुळे चित्रपटाचं बजेट मोठं असलं तरी कसलीही कसर बाकी न ठेवता दृश्यानुभव उच्च प्रतीचा राखण्याचा आमचा प्रयत्न आहे. अग्निशमन दलाच्या सर्वात कठीण, श्वास रोखून ठेवणाऱ्या मोहिमेचा थरार प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.” असे मत निर्माते रुतुजा बजाज आणि अनिल गायकवाड यांनी व्यक्त केले.
 
या चित्रपटातील कलाकार कोण?  या प्रश्नाचे उत्तर अजुनही गुलदस्त्यात आहे. ‘अग्निपंख’ची कथा गणेश कदम यांची असून पटकथा सचिन दरेकर यांनी लिहिली आहे. ‘रीतू फिल्म कट’ निर्मित ‘अग्निपंख’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

Chitrakoot Mountains आश्चर्यकारक चित्रकूट पर्वत

तारक मेहता फेम अभिनेता गुरुचरण सिंग सोढी विमानतळावरून बेपत्ता, तक्रार दाखल

शेगाव गजानन महाराज मंदिर परिसरातील दर्शनीय स्थळे

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बेबी बंबचे रेखाने घेतले चुंबन, सोशल मीडियावर व्हिडीओ वायरल

Salman Khan Firing Case: सलमानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणातील आरोपींना 29 एप्रिलपर्यंत कोठडी

पुढील लेख
Show comments