Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

५ वा ‘अंकुर फिल्म फेस्टिव्हल

Webdunia
शनिवार, 24 डिसेंबर 2016 (10:21 IST)
फिल्म निर्मितीसाठी जाणीवा आणि संवेदना महत्वाच्या – अनिल झनकर कार्यशाळेतून उलगडले फिल्म निर्मितीचे टप्पे
 
एखाद्या लघुपटाची निर्मिती करत असतांना आपल्या जाणीवा आणि संवेदना महत्वाच्या असतात. त्या जर जागृक असतील तर परिणामकारकता अगदी सहजपणे साधता येते असे मत भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया माजी सहायक प्राध्यापक आणि माहितीपट निर्मितीमध्ये तज्ञ असलेले अनिल झनकर यांनी व्यक्त केले आहे. अंकुर फिल्म फेस्टिव्हल च्या दुसऱ्या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या लघु चित्रपट बनवण्याच्या पध्दती (Approaches to Short film making) याविषयावर झालेल्या कार्यशाळेत ते बोलत होते.
 
अभिव्यक्ती मिडीया फॉर डेव्हलपमेंट आणि मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने ५ व्या ‘अंकुर फिल्म फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले आहे. हा फेस्टीव्हल येत्या २२ ते २५ डिसेंबर या काळात रावसाहेब थोरात सभागृह, गंगापूररोड, नाशिक येथे संपन्न होत आहे.
 
या निमित्तने फिल्म मेकर्सला मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळा घेण्यात आली आहे. यावेळी फिल्म निर्मितीचे वेगवेगळे टप्पे अनिल झनकर यांनी स्पष्ट केले. जेव्हा एखादी गोष्ट मनाला चटक लावते किंवा घर करते लोकांना सांगावीशी वाटते इथून फिल्म निर्मितीची प्रक्रिया सुरु होते. त्यामुळे फिल्म निर्मिती ही वास्तवादी असते. सुरुवातील संशोधन करून विषयाची पूर्ण माहितीएकत्र केली जाते. त्यानंतर पूर्व तयारी करत आणि संहिता लेखन सुरु होते. संहिता लेखनात स्थळ,काळ त्यातील असलेली पात्र  आदीचे बारकावे लक्षात घेऊन लिखाण केले जाते.
हे करत असताना सुरुवातीपासूनच वेळ मर्यादा ठरली नसली तरी उपलब्ध साधने आणि आर्थिक गणिते यांचा विचार करत पुढे जायला हवे असे झनकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी रिंगटोन,रेन हे लघुपट झनकर यांनी दाखविले आहेत.
 
याशिवाय सकाळच्या दोन सत्रांमध्ये आणि संध्याकाळीच्यासतरा फिल्मस दाखविण्यात आल्या. यात शाहिरी फिल्ममध्ये या कलेचा आढावा घेत आजचे चित्र मांडण्यात आले. तर प्रेक्षकाच्या विशेष पसंतीला बलुत ही फिल्म ठरली. यात एका महिलेची पतीच्या निधनानंतर रोजगाराची लढाई चित्रित करण्यात आली आहे.  

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

Chitrakoot Mountains आश्चर्यकारक चित्रकूट पर्वत

तारक मेहता फेम अभिनेता गुरुचरण सिंग सोढी विमानतळावरून बेपत्ता, तक्रार दाखल

शेगाव गजानन महाराज मंदिर परिसरातील दर्शनीय स्थळे

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बेबी बंबचे रेखाने घेतले चुंबन, सोशल मीडियावर व्हिडीओ वायरल

Salman Khan Firing Case: सलमानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणातील आरोपींना 29 एप्रिलपर्यंत कोठडी

पुढील लेख
Show comments