Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ठाकुर अनूपसिंग आणि मृण्मयीची 'बेभान' जोडी

Webdunia
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016 (10:11 IST)
ठाकुर अनूपसिंग हे नाव आपल्यासाठी काही नवीन नाही. मिस्टर वर्ल्ड विजेता ठाकुर अनूपसिंग आपल्या मराठीतल्या पहिल्या वहिल्या पर्दापणास सज्ज झाला आहे. अनूप अशोक जगदाळे दिग्दर्शित आगामी 'बेभान' या सिनेमात ठाकुर अनूपसिंगचा मराठमोळा अंदाज पाहता येणार आहे. सिंघम -3 या तेलगू तर कमांडो 2 या हिंदी अशा आगामी सिनेमांमध्ये ठाकुर अनूपसिंग झळकणार आहे.   दिग्दर्शक अनूप अशोक जगदाळे यांच्या 'बोभाटा' या सिनेमाची चर्चा सिनेवर्तुळात जोरदार चालू आहे. मधूकर (अण्णा) उद्धव देशपांडे हे निर्माते असून सह निर्माते प्रसाद देशपांडे आहेत. दिनेश देशपांडे यांनी सिनेमाची कथा लिहिली आहे.
 
शांभवी फिल्मस या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. येत्या वर्षात प्रदर्शित होणा-या या सिनेमात आपल्याला ठाकुर अनूपसिंग आणि मृण्मयी देशपांडे यांची हटके जोडी पाहता येणार आहे. या दोघांसोबतचं स्मिता जयकर व संजय खापरे यांच्याही अभिनयाचा आस्वाद घेता येणार आहे. 
 
 ए.वि प्रफुल्लचंद्र यांनी या सिनेमाला सुमधूर संगीत दिले असून मंगेश कांगणे यांनी गीते लिहिली आहेत. अनूप-अनूप अशा जोडगोळीचा रोमान्स विथ अॅक्शन असलेला सिनेमा 2017 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

Chitrakoot Mountains आश्चर्यकारक चित्रकूट पर्वत

तारक मेहता फेम अभिनेता गुरुचरण सिंग सोढी विमानतळावरून बेपत्ता, तक्रार दाखल

शेगाव गजानन महाराज मंदिर परिसरातील दर्शनीय स्थळे

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बेबी बंबचे रेखाने घेतले चुंबन, सोशल मीडियावर व्हिडीओ वायरल

Salman Khan Firing Case: सलमानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणातील आरोपींना 29 एप्रिलपर्यंत कोठडी

पुढील लेख
Show comments