Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'बॉईज’ चा डबल दंगा दाखवतोय ‘बॉईज २’ चा टीझर

Webdunia
शनिवार, 1 सप्टेंबर 2018 (13:35 IST)
शाळेतल्या करामतीनंतर महाविद्यालयाची पायरी चढलेले धैर्या, ढुंग्या आणि कबीर आता ‘बॉईज २’ मध्ये डबल धमाका करण्यास येत आहे. 'हाईट छोटी आहे, पण फाईट मोठी आहे' अशी धम्माल टॅगलाईन असलेल्या या सिनेमाच्या पोस्टरने अल्पावधीतच तुफान प्रसिद्धी मिळवली आहे. त्यामुळे, या पोस्टरनंतर 'बॉईज २' चा धमाकेदार टीझर नुकताच सोशल नेट्वर्किंग साईटवर लाँच करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, पोस्टरप्रमाणे या टीझरलादेखील प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमाच्या टीझरमधून सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतिक लाड यांची लंपटगिरी आपल्याला पहावयास मिळते. शाब्दिक कोट्यांची युथफुल मस्ती दाखवणारा हा टीझर तरुणाईला नादखुळा करून सोडत आहे. इरॉस इंटरनेशनल आणि एवरेस्ट इंटरटेंटमेन्ट प्रस्तुत, अवधूत गुप्ते यांच्या सहयोगाने सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रोडक्शनअंतर्गत प्रदर्शित होत असलेला 'बॉईज २' हा सिनेमा महाविद्यालयीन तरुणांसाठी पर्वणीच ठरणार आहे. 
 
विशाल देवरुखकर दिग्दर्शित ‘बॉईज’ चा हा धाम्माकेदार सिक्वेल ५ ऑक्टोबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. शिवाय ऋषिकेश कोळीच्या संवादलेखनाची बरसात या सिनेमात पाहायला मिळणार आहे. लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे आणि संजय छाब्रिया यांनी या सिनेमाच्या निर्मात्याची धुरा सांभाळली असून, इरॉस इंटरनेशनलद्वारे 'बॉईज २' चित्रपटाचे जागतिक स्तरावर वितरण देखिल केले जाणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ मालिकेत रोनित रॉय राजा सोमेश्वरची भूमिका साकारणार

३२ वर्षीय प्रसिद्ध रॅपरची आत्महत्या, कुटुंबाने त्याच्या पत्नीवर गंभीर गुन्ह्यांचा आरोप केला

हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय? चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित

सुरक्षित इंटरनेट दिनी यूनिसेफ इंडिया सोबत आयुष्मान खुराना जोडला गेला

चित्रपट 'छावा' सध्या चर्चेत, पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार

सर्व पहा

नवीन

रणवीर इलाहाबादियाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला नोटीस बजावली; यूट्यूब चॅनेल्सवर पसरणाऱ्या अश्लीलतेबद्दल सरकार काय करत आहे?

प्रेमाचा गोडवा घेऊन आला ‘गुलकंद’चा टिझर

नीमराणा किल्ला पॅलेस अलवर राजस्थान

छावा चित्रपट बघून प्रेक्षक झाले भावूक

एकता कपूरच्या वकिलाने बजावली नोटीस, 100 कोटींच्या मानहानीची चर्चा

पुढील लेख
Show comments