rashifal-2026

COMPASS - प्लॅनेट मराठीच्या 'कंपास'चा मुहूर्त संपन्न मल्टिस्टारर वेबसीरीजच्या चित्रीकरणाला सुरुवात

Webdunia
सोमवार, 23 जानेवारी 2023 (16:00 IST)
गतवर्षी 'प्लॅनेट मराठी'ने उत्तमोत्तम, सर्जनशील कॉन्टेन्ट देऊन आपल्या जगभरातील प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. दर्जेदार, राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट, लघुपट, सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या वेबसीरिज असा मनोरंजनाचा सर्वोत्कृष्ट खजिना दिल्यानंतर आता नवीन वर्षात नवीन कॉन्टेन्ट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास प्लॅनेट मराठी सज्ज झाले आहे. वर्षाची सुरुवात प्लॅनेट मराठी सुश्रुत भागवत दिग्दर्शित 'कंपास' या वेबसीरिजने करणार आहे. नुकताच या वेबसीरिजचा  मुहूर्त सोहळा मुंबईत पार पडला. यावेळी उर्मिला कानेटकर - कोठारे, सायली संजीव, ऋतुजा बागवे, पौर्णिमा डे, खुशबू तावडे, सुयश टिळक, संग्राम साळवी, सौरभ गोखले, धवल पोकळे, राजेंद्र शिसतकर, गिरीश जोशी, आनंद इंगळे, संजय मोने यांच्यासह निर्माते अक्षय बर्दापूरकर आणि संतोष रत्नाकर गुजराथी उपस्थित होते.
 
प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, " मागील वर्ष आमच्यासाठी खूप खास होते. प्रेक्षकांच्या आवडीनिवडी विचारात घेऊन आम्ही त्यांच्यासाठी मनोरंजनात्मक कॉन्टेन्ट आणले आणि विशेष म्हणजे ते प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. आता नवीन वर्षाची सुरुवात आम्ही 'कंपास' या वेबसीरिजच्या चित्रीकरणापासून करत आहोत. येत्या काळात आम्ही अनेक काल्पनिक, अकल्पनिय चित्रपट, वेबसीरिज, लघुकथा घेऊन भेटीला येऊ. 'कंपास' हा खूप वेगळा विषय असून यात कसलेल्या कलाकारांची दमदार फळी आहे. 'कंपास' हे नावाच खूप अपिलिंग असून यात प्रेक्षकांना काहीतरी जबरदस्त क्राईम थ्रिलर पाहायला मिळणार आहे.''
 
दिग्दर्शक सुश्रुत भागवत म्हणतात, " नवीन वर्षात प्लॅनेट मराठी सोबत नव्यानं पुन्हा एकदा काम करण्याची संधी मिळणे, ही खूपच आनंदाची बाब आहे. 'कंपास' ही एक क्राईम थ्रिलर आहे, यापेक्षा अधिक मी काहीही सांगणार नाही, हां एवढं मात्र नक्की की अशी वेबसीरीज या आधी मराठीत तुम्ही पाहिली नसेल.''
Published By -Smita Joshi 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

आलिया भट्ट डिजिटल जगाला निरोप देईल? अभिनेत्रीच्या ताज्या विधानामुळे खळबळ उडाली

महेश बाबू यांचा 'वाराणसी' हा चित्रपट या दिवशी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार

Mardaani 3 Review 'मदानी ३' पाहण्यापूर्वी हा रिव्ह्यू नक्की वाचा; धाडसी शिवानी रॉयची सर्वात कमकुवत लढाई?

'धुरंधर' ते देवखेल'... OTT वर या आठवड्यात काय पाहाल? या ५ सिनेमा आणि वेब सिरीज नक्की बघा

अरिजीत सिंह करणार राजकारणात एन्ट्री!

सर्व पहा

नवीन

Dhurandhar 2 मध्ये सलमान खान? भाईजान 'बडे साहेब' ची भूमिका साकारणार, व्हायरल झालेल्या फोटोमागील सत्य काय आहे?

कमी खर्चात परदेशवारी! 'या' देशांना भेट देण्यासाठी भारतीयांना व्हिसाची गरज नाही

सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना ‘सूर्यदत्त जीवनगौरव पुरस्कार देण्याची घोषणा

संगीतकार एस.पी. वेंकटेश यांचे वयाच्या 70 व्या वर्षी निधन

धुरंदर 2' चा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर मुंबई पोलिसांकडून चित्रपटाच्या टीम विरुद्ध एफआयआर दाखल

पुढील लेख
Show comments