Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'एक होतं पाणी'ची दाहकता १० मे पासून रुपेरी पडद्यावर

Webdunia
दुष्काळाची दाहकता रुपेरी. पडद्यावर मांडणारा व्ही.पी.व्हर्ल्ड मुव्हीजव न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज प्रस्तुत डॉ.प्रवीण भुजबळ व विजय तिवारी निर्मित आणि रोहन सातघरे दिग्दर्शित 'एक होतं पाणी' हा पाणी समस्येसारख्या ज्वलंत सामाजिक विषयावर  भाष्य करणारा चित्रपट येत्या १० मे पासून महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

अनेक चित्रपट महोत्सवांत यशस्वी  मोहोर लागवणारा 'एक होतं पाणी' या चित्रपटाने 'अंबरनाथ चित्रपट महोत्सवा'मध्ये तब्बल ६ नामांकनं पटकावलेली त्यातील २ पुरस्कारांवर म्हणजेच' सर्वोत्कृष्ट कथा-आशिष निनगुरकर' आणि 'सर्वोत्कृष्ट बाल कलाकार चैत्रा भुजबळ' या  पुरस्कारांवर आपला ठसा उमटवला तर "नोएडा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल" व 'इंडियन वर्ल्ड  फिल्म फेस्टिवलमध्ये; 'विशेषलक्षवेधी परीक्षक पसंती' या पुरस्काराने या चित्रपटाला सन्मानित करण्यात आले.नुकत्याच झालेल्या पहिल्या अहमदनगर फिल्म फेस्टिवलमध्ये या चित्रपटाला "सर्वोत्कृष्ट सामाजिक आशय चित्रपट",सर्वोत्कृष्ट खलनायक व सर्वोकृष्ट पोस्टर" असे पुरस्कार मिळाले.
एक होता राजा.. एक होती राणी. उद्या म्हणू नका 'एक होतंपाणी' अशी हटके टॅगलाईन असणारा हा चित्रपट सध्या मराठी चित्रपटसृष्टीत कौतुकाचा विषय  ठरत आहे. दर्जेदार निर्मितीमूल्य, उत्तम कथानक  आणि प्रतिभावान कलाकारांच्या अचूक समीकरणाने सिनेसृष्टीतील मान्यवरां सोबतच रसिक-प्रेक्षकांचीही शाबासकी मिळवेल अशी निर्माता-दिग्दर्शकांना आशा आहे. आशिष निनगुरकर यांच्या लेखणीतून आकारास आलेला हा विषय समाजाच्या डोळ्यांत जळजळीत अंजन घालणारा  असून  सद्यस्थितीला धरून आहे.  सामाजिक बांधिलकी जपत  आपलं भविष्य आपल्याच हाती आहे हा संदेश 'एक होतं पाणी' अधोरेखित करतो. 'पाणी अडवा पाणी जिरवा'ची सध्या नितांत गरज असून 'एक होतं पाणी' म्हणण्याची वेळ येऊ देण्यापूर्वीच त्याविषयी समाजात जागरूकता घडवून आण्यासाठी हा चित्रपट नक्कीच मदतशील ठरेल.
 
'एक होतं पाणी' या चित्रपटात  हंसराज जगताप, उपेंद्र दाते, अनंत जोग, जयराज नायर, गणेश मयेकर, रणजित जोग, श्रिया मस्तेकर, रणजित कांबळे, त्रिशा पाटील, शीतल कल्हापुरे, शीतल शिंगारे, आनंद वाघ, नाना शिंदे, अनुराधाभावसार, डॉ राजू पाटोदकर, राधाकृष्ण कराळे, दिपज्योती नाईक, बालकलाकार चैत्रा भुजबळ  आदि कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका पाहायला  मिळतील. या  चित्रपटाचे छायाचित्रण योगेश  अंधारे यांनी केले असून हा  चित्रपट १० मेपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दिग्दर्शक आणि आर्ट डिझायनर सुमित मिश्रा यांचे निधन

अक्षय कुमार स्टारर वेलकमला17 वर्षे पूर्ण झाली, अनिल कपूरने जुने दिवस आठवत पोस्ट केली

पुष्पा 3 बाबत अल्लू अर्जुनने घेतला मोठा निर्णय

एका मुलाच्या प्रेमात करीना कपूरने तोडले घराचे कुलूप, नंतर तिच्या आईने तिला बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवले

Year Ender 2024 कमी बजेटमध्ये बनवलेले 5 चित्रपट, ज्यांनी यावर्षी चांगलीच धमाल केली

सर्व पहा

नवीन

Look Back Entertainment: या टीव्ही कलाकारांचा 2024 मध्ये घटस्फोट झाला, अनेक वर्षांचे नाते संपवले.

Christmas 2024: सांताक्लॉजचे गाव लॅपलँड

Border 2 Release Date:सनी देओलचा 'बॉर्डर 2' या दिवशी रिलीज होणार

चेंगराचेंगरी प्रकरणी हैदराबाद पोलिसांनी 'अल्लू अर्जुन'ला पाठवले समन्स

राजकारणात ही मान-अपमान, 'संगीत मानापमान'च्या ट्रेलर लॉन्चप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी मजेदार गोष्टी शेअर केल्या

पुढील लेख
Show comments