Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दोन मराठी अभिनेत्यांमध्ये रंगले फेसबुक वॉर

Webdunia
शुक्रवार, 30 सप्टेंबर 2022 (15:15 IST)
अमेय वाघ आणि सुमित राघवन हे दोघेही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेते. हे दोघेही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतात. अवघ्या दोन दिवसांपूर्वी या दोघांमध्ये फेसबुक वॉर दिसले. यामुळे हे दोघे चर्चेत आले. अमेय वाघ आणि सुमित राघवन यांच्यात वाद सुरू होते. या दोघांच्या फेसबुक पोस्टने आणि एकमेकांवरील टीकांमुळे त्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. हा वाद नेमका कशावरुन सुरू झाला, याचा आता उलगडा झाला आहे.
 
अमेय वाघ याने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधूनच याचा उलगडा झाला आहे. अमेयने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत अमेय वाघ आणि सुमित राघवन एकमेकांसमोर उभे राहून पंजा लढवताना दिसत आहे. ‘पडद्यामागे आहे पक्की दोस्ती, तर पडद्यासमोर रंगणार मनोरंजनाची कुस्ती’, असे यावर लिहिले आहे. याला कॅप्शन देताना अमेय वाघ म्हणाला, ‘झी मराठी अवॉर्ड २०२२’ लवकरच तुमच्या भेटीला येतोय. यावेळी दोन मित्रांचं आगळं – वेगळं युद्ध पाहायला मिळणार आहे. तयार व्हा या भन्नाट अनुभवासाठी….” अमेय वाघने शेअर केलेली ही पोस्ट काही सेकंदातच व्हायरल झाली आहे.
 
मात्र, अमेयच्या या पोस्टवर अनेकांनी त्याला ट्रोल केले. तुला चांगल्या सोशल मीडिया मॅनेजरची गरज आहे, जो तुला चांगले फंडे देईल, असे एका नेटकऱ्याने म्हटले आहे. तर एकाने राघू मैना…नाही नाही राघू वाघू, अशी कमेंट केली आहे. लोकांना धंद्याला लावून प्रमोशनचे फंडे करतात, अशी कमेंट एकाने केली आहे.
 
अमेय वाघने रविवार, २५ सप्टेंबर रोजी दुपारी एक पोस्ट शेअर केली. ‘जंगलात राघू (सुमीत राघवन) खूप असतात पण वाघ मात्र एकच असतो, याची कृपया नोंद घ्यावी”, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. या पोस्टमध्ये त्याने सुमित राघवनला टॅग केले. अमेयने असे का केले असावे, याने सगळेच बुचकळ्यात पडले. सुमित राघवननेही अमेयच्या या पोस्टवर रिप्लाय केला आहे. “सर्कशीतल्या वाघाचा फार त्रागा होतोय असं दिसतंय. केवळ आडनाव वाघ असल्याने कोणी वाघ होत नाही याचीही कृपया नोंद घ्यावी”, अशी कमेंट सुमितने केली. यात त्याने अमेय वाघलाही टॅग केले. त्यानंतरच त्यांच्यात वादाची ठिणगी पडल्याचे दिसले.
 
“वाघ कुठलाही का असेना, शेवटी त्याच्या डरकाळीची दखल घेतलेली दिसते आहे, अशी अशी खोचक पोस्ट अमेय वाघाने त्यावर शेअर केली. त्यात त्याने सुमितला टॅग केले. त्यावर पुन्हा सुमितने उत्तर दिले आहे. “अमेय वाघ घाबरून ठोकलेली आरोळी असते, डरकाळी नव्हे आणि जर एखाद्याच्या विव्हळण्याला आपण डरकाळी म्हणत असू तर प्रकरण गंभीर आहे.” “प्रकरण कितीही गंभीर असलं तरी मी तेवढाच खंबीर आहे”, असे म्हणते अमेयने सुमितला प्रत्युत्तर दिले.

Edited By - Ratandeep Ranshoor 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अजय देवगण आणि काजोलच्या 'इश्क' चित्रपटाला 27 वर्षे झाली पूर्ण

सन ऑफ सरदारच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या मुलाचे वयाच्या 18व्या वर्षी निधन

नागराज मंजुळे यांना महात्मा फुले समता’ पुरस्कार मिळणार

Rakhi Sawant: गरिबीत गेले बालपण,त्यानंतर राखी बनली बॉलिवूडची ड्रामा क्वीन

अटक टाळण्यासाठी राम गोपाल वर्मा घरातून गायब,व्हिडिओ जारी केला

सर्व पहा

नवीन

रेल्वे म्यूजियम दिल्ली

एजाज खानच्या घरातून सीमाशुल्क विभागाने जप्त केले ड्रग्ज, अभिनेत्याच्या पत्नी फॅलन गुलीवालाला अटक

पुष्पा २: नियमावर सेन्सॉर बोर्डाची कात्री, चित्रपटाचा रनटाइम इतका तास असेल

वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालय मुंबई

Saif Ali Khan: साऊथच्या हिट चित्रपटाच्या रिमेकमध्ये सैफ अली खान दिसणार

पुढील लेख
Show comments