Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मराठीच्या मोठ्या पडद्यावर होणार 'फाईट'

Webdunia
शनिवार, 3 नोव्हेंबर 2018 (15:04 IST)
बॉलीवूडप्रमाणे आता मराठी चित्रपटातही स्टंट आणि अॅक्शनची तुफान फटकेबाजी प्रेक्षकांना पाहता येणार आहे. कारण, फ्युचर एक्स प्रोडक्शन निर्मित आगामी 'फाईट' या चित्रपटाद्वारे सिनेरसिकांना अॅक्शनपटाची जबरदस्त मेजवानी मिळणार आहे. लवकरच प्रदर्शित होत असलेला हा सिनेमा मराठीतील कौटुंबिक आणि प्रेमकथेसारख्या चाकोरीबद्ध सिनेमांहून अगदी वेगळा आहे. जिमी मोरे दिग्दर्शित 'फाईट' या सिनेमाचा नुकताच सोशल नेट्वर्किंग साईटवर टीझर पोस्टर लाँच करण्यात आला. 
 
अॅक्शनचा जबरदस्त तडका असलेल्या या सिनेमाच्या टीझर पोस्टरवर एक नवा चेहरा आपल्याला पाहायला मिळतो. मराठी सिनेसृष्टीत दमदार पदार्पण करणाऱ्या या जिगरबाज तरुणाचे नाव जीत आहे. विशेष म्हणजे, छोट्या शहरातून आलेल्या या तरुणाने 'फाईट' सिनेमातील अॅक्शन सीनसाठी भरपूर मेहनत घेतली असल्याचे सिनेमाच्या टीझर पोस्टरमधून पाहायला मिळते. 'फाईट' या चित्रपटाचे ललित ओसवाल निर्माते आहेत. मराठीच्या मोठ्या पडद्यावरील ही 'फाईट' पाहण्यासाठी प्रेक्षकदेखील उत्सुक असतील हे निश्चित !

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अजय देवगणच्या 'रेड 2' चा टीझर प्रदर्शित,आयकर अधिकारी अमय पटनायकच्या भूमिकेत दिसणार

तारक मेहता मध्ये अखेर दयाबेन परत येतीये?

‘एप्रिल मे ९९’ मध्ये झळकणार ‘हे’ चेहरे

सनी देओलचा 'लाहोर 1947' या वर्षी प्रदर्शित होणार

अक्षय कुमारच्या केसरी 2 चा टीझर प्रदर्शित, जालियनवाला बाग हत्याकांडाची कहाणी दाखवली जाणार

सर्व पहा

नवीन

युट्यूबर रणवीर इलाहाबादियाने आपला पासपोर्ट जारी करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली

सिकंदर ठरला वर्षातील दुसरा सर्वात मोठा ओपनर, पहिल्या दिवशी इतकी कमाई केली

कपिल शर्मा पुन्हा एकदा लोकांना हसवण्यास सज्ज, ईदच्या दिवशी केली 'किस किस को प्यार करूं २' ची घोषणा

श्री गणेश मंडळात रामनवमी निमित्त रामायण गीत

'सिकंदर'ने ईदवर धुमाकूळ घातला, दुसऱ्या दिवशी ५५ कोटींचा आकडा ओलांडला

पुढील लेख
Show comments