Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

१७ डिसेंबरला बसणार 'फ्री हिट दणका'

Webdunia
मंगळवार, 5 ऑक्टोबर 2021 (21:42 IST)
२२ ऑक्टोबरपासून सिनेमागृहे सुरु होणार असल्याची बातमी आली आणि इतके महिने आतुरतेने वाट पाहणाऱ्या चित्रपटसृष्टी आणि चित्रपटप्रेमींमध्ये एक उत्साहाचे आणि सकारात्मक वातावरण निर्माण झाले. अनेक महिन्यांपासून बंद असलेल्या चित्रपटगृहांनाही आता प्रेक्षकांची आस लागली असून लवकरच प्रेक्षक आता आपल्या आवडत्या चित्रपटाचा आनंद थिएटरमध्ये बसून घेतील. मागील अनेक महिन्यांपासून रखडलेल्या प्रदर्शनाच्या तारखाही आता जाहीर होऊ लागल्या आहेत. त्यापैकीच एक एसजीएम फिल्म्स प्रस्तुत 'फ्री हिट दणका' या चित्रपटाचे नवीन पोस्टर आणि प्रदर्शनाची तारीखही जाहीर झाली असून हा चित्रपट १७  डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सुनील मगरे दिग्दर्शित या चित्रपटात फँड्री' फेम सोमनाथ अवघडे, अपूर्व एस.यांच्यासह 'सैराट' चित्रपटातील जोडी अरबाज (सल्या) आणि तानाजी (लंगड्या)  यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा आणि पटकथा सुनील मगरे यांचीच असून, लेखन आणि संवाद संजय नवगीरे यांचे आहेत. आकाश अलका बापू ठोंबरे, मेघनाथ गुरुनाथ सोरखडे आणि  सुनिल मगरे चित्रपटाचे निर्माते आहेत तर नितीन बापू खरात, सुधाकर लोखंडे आणि सत्यम तरडे यांनी सहनिर्मात्यांची धुरा सांभाळली आहे.
 
    प्रेमाच्या महिन्याचे औचित्य साधून या प्रेमकथा असलेल्या 'फ्री हिट दणका' या चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. आता लवकरच प्रेक्षकांना या  प्रेमाचा दणका चित्रपटगृहात पाहाता येणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

आयुष्मान खुरानाने त्याच्या पहिल्या लाईव्ह सिंगिंग परफॉर्मन्सचे श्रेय अरिजीत सिंगला दिले

भूल भुलैया 3 ने सिंघम अगेनला टाकले मागे, चार आठवड्यात 247 कोटींची कमाई

एआर रेहमानसोबतच्या नात्याच्या अफवांवर मोहिनी डे यांनी मौन सोडले

फोर्स ऑफ नेचर: द ड्राय 2 आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला

अनुपमा'च्या सेटवर विजेचा धक्का लागल्याने कॅमेरा असिस्टंटचा मृत्यू, निर्माता म्हणाले-

सर्व पहा

नवीन

भारतातील पाच असे स्थळ जिथे अप्रतिम सुपरमून दिसतो

अटक टाळण्यासाठी राम गोपाल वर्मा घरातून गायब,व्हिडिओ जारी केला

सन ऑफ सरदारच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या मुलाचे वयाच्या 18व्या वर्षी निधन

ब्रम्हाजी मंदिर पुष्कर राजस्थान

नागराज मंजुळे यांना महात्मा फुले समता’ पुरस्कार मिळणार

पुढील लेख
Show comments