Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'फुगे'मध्ये दिसणार स्वप्नील-सुबोधचा 'याराणा'

Webdunia
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017 (12:14 IST)
प्रेमात सारे काही माफ असते असे म्हणतात, मग मैत्रीत का नाही? प्रेमात अपेक्षा आडव्या येतात पण मैत्री ही निस्वार्थ असते, त्यामुळेच ती प्रेमापेक्षा श्रेष्ठ ठरते. आपल्या अवतीभोवती असे अनेक मित्र-मैत्रिणी सापडतील कि ज्यांना आपली दोस्ती इतर नात्यांहून अधिक खास वाटत असते. मैत्रीच्या जगात रमणाऱ्या या दोस्तांची ही कॅमिस्ट्री त्यांच्या कुटुंबांकरीता कधीकधी डोकेदुखी बनून जाते. अशा या घनिष्ट मित्रांवर आधारित असलेला 'फुगे' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे या सिनेमाच्या निमित्ताने प्रथमच स्वप्नील जोशी आणि सुबोध भावे यांची ऑनस्क्रीन कॅमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना पाहता येणार आहे. 
 
'फुगे' हे आनंदाचे प्रतिक असल्यामुळे लोकांना आनंदी राहण्याचा संदेश या सिनेमाच्या माध्यमातून चित्रपटाची टीम देत आहे, त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात लक्ष फुग्यांचे वाटप या सिनेमाची टीम करत आहे. याच योजनेअंतर्गत फुगेच्या संपूर्ण टीमने पुण्यातील एच. आय.व्ही. पिडीत मुलांचे संगोपन करणाऱ्या  मानव्य या एनजीओमध्ये सदिच्छा भेट दिली. त्यावेळी तिथे उपस्थित असणाऱ्या मुलांना गायक स्वप्नील बांदोडकरने गायनाचे धडे देखील दिले. पुण्यात नव्याने स्थापन झालेल्या त्याच्या म्युजीकल इंस्टीटयूट मधील एक प्राध्यापक महिन्यातून एकदा या संस्थेतील मुलांना गायनाचे धडे मोफत शिकवण्यास येईल, असे आश्वासन त्याने दिले, तसेच अगर मला वेळ मिळाल्यास मीदेखील इथे मार्गदर्शन देण्यास हजर राहत जाईल, असेही त्याने पुढे सांगितले. मानव्य संस्थेतील मुलांनी देखील आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करत, मोठ्या उत्साहात फुगे टीमसोबत काही क्षण घालवले. अशाप्रकारे प्रेम  आणि मैत्री यावर भाष्य करणारा हा सिनेमा मनोरंजनासोबतच आयुष्य स्वच्छंदी जगण्याचा सल्ला देखील देऊन जात आहे. 
 
या चित्रपटांची गाणी देखील मजेशीर आणि तरुणाईना भुरळ घालणारी आहेत. त्यातील संगीत दिग्दर्शक अमितराजच्या आवाजातील 'पार्टी दे' हे गाणं चांगलच गाजत असून, रोचक कोहली दिग्दर्शित फुगेच्या शीर्षकगीताने देखील मनमौजी युवकांना आपल्या कवेत घेतले आहे. शिवाय 'काही कळे तुला' हे स्वप्नील-प्रार्थना आणि सुबोध -नीता वर आधारित असलेले प्रेमगीत प्रेमाच्या स्वप्नवत दुनियेत रसिकांना घेऊन जात आहे. स्वप्नील बांदोडकर आणि जाहन्वी प्रभू अरोरा या जोडगोळीने गायलेले हे गाणं मंदार चोळकर यांनी शब्दबद्ध केले असून याला निलेश मोहरीर यांचे संगीत लाभले आहे. 
 
प्रार्थना बेहेरे, नीता शेट्टी, मोहन जोशी, सुहास जोशी आणि आनंद इंगळे यांची देखील यात भूमिका असणार आहे. शिवाय बॉलीवूडचे दिग्दर्शक निशिकांत कामत यात खलनायकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येत आहे.
 
या सिनेमाची निर्मिती एस टीव्ही नेटवर्क्ससोबत जीसिम्सचे अर्जुनसिंग बऱ्हान, कार्तिक निशानदार तसेच अश्विन आंचन आणि अनुराधा जोशी यांनी केली असून इंदर राज कपूर या सिनेमाचे प्रस्तुतकर्ते आहेत. 
 
'फुगे' या नावाने हा सिनेमा विनोदी आणि मनोरंजनाची खुमासदार मेजवाणी देणारा आहे, याचा अंदाज प्रथमदर्शनी आला असला तरी, यात नेमके काय आहे, याचे गुपित  येत्या १० फेब्रुवारीला सिनेमा प्रदर्शित झाल्यावरच कळेल. 
 
त्यामुळे स्वप्नील जोशी आणि सुबोध भावे नव्हे तर स्वप्नील भावे आणि सुबोध जोशी या नवीन दोस्तांचा हा गमतीशीर स्वप्ना वाघमारे दिग्दर्शित सिनेमा प्रेमाची बॅकस्टोरी सांगण्यास सज्ज झाला आहे.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

पुढील लेख
Show comments