Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

GHAR BANDUK BIRYANI - 30 मार्चला प्रदर्शित होणार 'घर बंदूक बिरयानी’

Webdunia
गुरूवार, 12 जानेवारी 2023 (16:02 IST)
झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे निर्मित ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटाचा भन्नाट टिझर काही महिन्यांपूर्वी झळकला होता. पोलीस आणि नक्षलवादी यांच्यातील चकमक, पळापळी यात दिसत होती. त्यामुळे नेमके या चित्रपटात प्रेक्षकांना काय पाहायला मिळणार, याची उत्सुकता लागून राहिली होती. प्रेक्षकांची ही प्रतीक्षा आता लवकरच संपणार असून येत्या ३० मार्च रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित या चित्रपटात सयाजी शिंदे, नागराज मंजुळे आणि आकाश ठोसर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
 
झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे यांनी एकत्र येऊन मराठी सिनेसृष्टीला ‘फँड्री’,‘सैराट’,‘नाळ’असे दर्जेदार चित्रपट दिले आहेत. त्यांच्या चित्रपटात नेहमीच वैविध्यपूर्ण आणि अनन्यसाधारण विषय हाताळले जातात. त्यांची हीच खासियत घेऊन झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे ‘घर बंदूक बिरयानी’च्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत.  
 
 या चित्रपटाबद्दल नागराज मंजुळे म्हणतात, " झी स्टुडिओजसोबत काम करण्याचा अनुभव हा नेहमीच अनोखा असतो. या वेळी पुन्हा आम्ही एक नाविन्यपूर्ण विषय घेऊन आलो आहोत. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून अनेकांना या चित्रपटाविषयी जाणून घेण्याची उत्सुकता लागली होती. त्याबाबत विचारणाही होत होती. आता लवकरच या सगळ्याची उत्तरे प्रेक्षकांना मिळणार आहेत.''
Published By -Smita Joshi 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

आयुष्मान खुरानाने त्याच्या पहिल्या लाईव्ह सिंगिंग परफॉर्मन्सचे श्रेय अरिजीत सिंगला दिले

भूल भुलैया 3 ने सिंघम अगेनला टाकले मागे, चार आठवड्यात 247 कोटींची कमाई

एआर रेहमानसोबतच्या नात्याच्या अफवांवर मोहिनी डे यांनी मौन सोडले

फोर्स ऑफ नेचर: द ड्राय 2 आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला

अनुपमा'च्या सेटवर विजेचा धक्का लागल्याने कॅमेरा असिस्टंटचा मृत्यू, निर्माता म्हणाले-

सर्व पहा

नवीन

अटक टाळण्यासाठी राम गोपाल वर्मा घरातून गायब,व्हिडिओ जारी केला

सन ऑफ सरदारच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या मुलाचे वयाच्या 18व्या वर्षी निधन

ब्रम्हाजी मंदिर पुष्कर राजस्थान

नागराज मंजुळे यांना महात्मा फुले समता’ पुरस्कार मिळणार

बिग बॉस फेम हिमांशी खुरानाच्या वडिलांना पाच वर्षे जुन्या प्रकरणात अटक

पुढील लेख
Show comments