Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

माझं मराठी असणं मला जास्त स्टायलिश वाटतं - अमेय वाघ

Webdunia
गुरूवार, 19 डिसेंबर 2019 (16:55 IST)
मराठी चित्रपटसृष्टीचा युवास्टार 'अमेय वाघ' चा स्वेग आता संपूर्ण महाराष्ट्रात पसरला आहे. चित्रपट, लघुचित्रपट, मालिका, नाटक आणि वेबसिरीज अश्या प्रत्येक माध्यमातून आपल्या अभिनयाची छबी उमटवणाऱ्या या अभिनेत्याने मराठी प्रादेशीक अभिनय क्षेत्रात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. तरुण पिढींच्या गळ्यातला ताईत झालेल्या या तरुण कलाकाराच्या स्टाईलची सर्वत्र चर्चा देखील होत असते. आपल्या प्रत्येक प्रोजेक्टच्या प्रमोशनला हटके फेशन करणाऱ्या या अवलीयाची दखल नुकत्याच झालेल्या लोकमत मोस्ट स्टायलिश अवार्डने घेतली. दिमाखात पार पडलेल्या या पुरस्कार सोहळ्यात अमेयला प्रादेशिक चित्रपट (डिजिटल) विभागात सर्वोत्कृष्ट स्टायलिश अभिनेत्याचा किताब मिळाला. हा किताब स्वीकारताना अमेयने मराठी प्रेक्षकांना त्यांचे श्रेय दिले. 'माझं मराठी भाषेवर आणि माझ्या कलेवर प्रेम आहे, माझं मराठी असणं मला जास्त स्टायलिश वाटतं, त्यामुळे हे अवॉर्ड मी माझ्या सर्व मराठी प्रेक्षकांना डेडिकेट करतो' असे भावोद्गार त्याने काढले.
अमेय वाघचा लवकरच 'धुरळा' हा आगामी चित्रपट प्रेक्षकांसमोर येत आहे. ३ जानेवारीला प्रदर्शित होत असलेल्या या चित्रपटाद्वारे आपला हा लाडका 'वाघ' राजकीय धुरळा उडवायला तयार झाला आहे. नवीन वर्षाच्या या धमाकेदार सुरुवातीबरोबरच अमेय आणखीन बऱ्याच गोष्टी आपल्या चाहत्यांसमोर घेऊन येणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सोनू निगमची मराठमोळी सुरुवात,आपल्या सुमधुर आवाजाने गायलं २०२५ चं पहिलं गाणं ‘चंद्रिका’

कहो ना प्यार है' पुन्हा रिलीज झाल्याने 25 वर्षांनंतर ही हृतिक रोशनची जादू कायम राहणार का?

अक्षय कुमारच्या 'भूत बांगला' या हॉरर कॉमेडी चित्रपटाचे पुढील शूटिंग जयपूरमध्ये सुरू

Munjya 2 Release Date : 2024 ची बेस्ट हॉरर-कॉमेडी ‘मुंज्या’ चा पार्ट-2 कधी येणार जाणून घ्या

बंदिश बँडिट्सची अभिनेत्री श्रेया चौधरीने शेअर केला तिचा प्रेरणादायक प्रवास

सर्व पहा

नवीन

सहारा तीसरे मोठे डेजर्ट अफ्रीका

दीपिका पदुकोण कल्की 2898 एडी भाग 2 च्या शूटिंगसाठी सज्ज

संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणी जखमी झालेल्या मुलाला भेटण्यासाठी अल्लू अर्जुन पहिल्यांदाच रुग्णालयात दाखल

अभिनेत्री पूनम धिल्लनच्या घरात चोरी

Sri Girijataka Ganapati लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक गणपती पूर्ण माहिती

पुढील लेख
Show comments