Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

LAGNKALLOL : आता लवकरच होणार 'लग्नकल्लोळ'

LAGNKALLOL : आता लवकरच होणार 'लग्नकल्लोळ'
, शनिवार, 18 सप्टेंबर 2021 (18:48 IST)
असे म्हणतात, 'लग्न पहावे करून'. लग्न ही बाब एकच असली तरी त्याची प्रत्येकाची कहाणी वेगवेगळी असते.  याच लग्नसंस्थेवर भाष्य करणारा  'लग्नकल्लोळ' हा थोडासा वेगळ्या धाटणीचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असून त्याचा टिझर सोशल मिडियावर प्रदर्शित झाला आहे. मयूर तिरमखे फिल्म्स प्रस्तुत आणि मोहम्मद बर्मावाला दिग्दर्शित 'लग्नकल्लोळ' हा चित्रपट लग्नाच्या एका वेगळ्या पैलूवर प्रकाशझोत टाकणारा आहे. 
 
या चित्रपटात सिद्धार्थ जाधव, भूषण प्रधान, मयुरी देशमुख यांच्या मुख्य भूमिका असून डॉ. मयूर तिरमखे, अण्णासाहेब रामचंद्र तिरमखे, मंगल अण्णासाहेब तिरमखे हे या चित्रपटाचे निर्माता आहेत. हा चित्रपट प्रेक्षकांना लग्नसंस्थेच्या एका वेगळ्या बाजूची ओळख करून देईल हे नक्की.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शमिता शेट्टीने जीजा राज कुंद्राबद्दल प्रश्न विचारल्यावर आईने तीन शब्दात उत्तर दिले