Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अशोक सराफांना महाराष्ट्र भूषण; जेव्हा त्यांच्या अभिनयाला दिलीप कुमारांनी दाद दिली होती

Webdunia
बुधवार, 31 जानेवारी 2024 (09:52 IST)
ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी सराफ यांना हा पुरस्कार दिला जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
 
अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर अगदी खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडविले आणि रसिकांवर अधिराज्य गाजवले, असे मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन करतांना म्हटले आहे.
 
अशोक सराफ यांचे 'अशी ही बनवाबनवी', 'धुम धडाका', 'बाळाचे बाप ब्रम्हचारी,' 'भुताचा भाऊ,' 'पंढरीची वारी', असे अनेक चित्रपट गाजले आहेत.
 
सहज-सोप्या अभिनय कौशल्याने अशोक सराफ यांनी मराठी चित्रपटसृष्टीला एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे.
 
अशोक सराफांच्या टायमिंगवर शाबासकीची थाप
मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांना त्यांच्या अभिनयातील 'टायमिंग'साठी ओळखलं जातं.
 
सराफ यांच्यातील अभिनयातील टायमिंग सर्वप्रथम कुणी हेरलं असेल, तर ते दिलीप कुमार यांनी.
 
एका नाटकाच्या वेळी दिलीप कुमार यांनी अशोक सराफ यांच्या अभिनयाचं कौतुक करताना पाठीवर शाबासकीची थापही मारली होती.
 
दोन वर्षांपूर्वी बीबीसी मराठीशी बोलताना अशोक सराफ म्हणाले की, "मी दिलीप कुमार यांच्यासोबत कधीच काम केलं नाही. अभिनय क्षेत्रात असूनसुद्धा फारच कमी वेळा आमच्या भेटी-गाठींचा प्रसंग आला. पण त्यांच्याशी झालेली पहिली भेट माझ्या मनावर कायमची कोरली गेली आहे."
 
सराफ म्हणतात, "मी त्यावेळी अभिनय क्षेत्रात तसा नवखाच होतो. 'संशयकल्लोळ' नाटकात भादव्याची भूमिका करायचो. आमच्या नाटकाच्या प्रयोगासाठी शिवाजी मंदिर नाट्यगृहात एकदा दिलीप कुमार यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आलं होतं."
 
दिलीप कुमार यांच्यासोबत झालेल्या भेटीबाबत सराफ पुढे सांगतात, "नाटकाचा प्रयोग झाल्यानंतर आम्हाला सर्वांना दिलीप कुमार यांची भेट घेण्याची संधी मिळाली.
 
त्यावेळी मला पाहून दिलीप कुमार माझ्याजवळ आले. ते म्हणाले, 'क्या गजबकी 'टायमिंग' है आपकी!' इतकंच नव्हे तर त्यांनी माझ्या पाठीवर शाबासकीही दिली. मी त्यांचे आभार मानले. त्यावेळी दिलीप कुमार यांच्यासोबत झालेला माझा इतकाच तो संवाद. पण तो प्रसंग कायमचा माझ्या आठवणीत राहिला आहे."
 
"संशयकल्लोळ नाटकात मी करत असलेल्या भादव्याची भूमिका तशी थोडीफार दुय्यम होती. त्यात टायमिंगला इतका वाव नाही, असं मला त्यावेळी वाटत होतं. पण दिलीप कुमार यांनी त्या भूमिकेतील टायमिंग अगदी चपखलपणे हेरलं. अशा प्रकारची प्रतिक्रिया मला त्याआधी कुणीच दिलेली नव्हती. त्यामुळेच मी खूप भारावून गेलो होतो," असं सराफ यांनी सांगितलं.
 
अशी ही बनवाबनवी' चित्रपट आजही आपल्या सर्वांच्या आवडीच्या
सचिन पिळगावर दिग्दर्शित 'अशी ही बनवाबनवी' चित्रपट आजही सर्वांच्या आवडीच्या चित्रपटांपैकी एक आहे.
 
दुधाच्या रांगेत खूप वेळ लागणार हे लक्षात आल्यानंतर पोटात कळ येऊन बसकण मारणारा धनंजय माने पाहताक्षणी आपला वाटू लागतो. त्याच्या हातात एक माणूस बाटली देऊन तो माणूस म्हणतो- काही काळजी करू नका. मी रिकामटेकडाच आहे. इतकं खरं वाक्य आपल्या चित्रपटांमध्ये नसतं. या चित्रपटातील अशोक सराफ यांचं 'धनंजय माने' हे आजही डोळ्यांसमोर जसंच्या तसं समोर उभं राहातं.
 
अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर, सुधीर जोशी, अश्विनी भावे, निवेदता जोशी-सराफ, प्रिया बेर्डे, सुप्रिया पिळगावकर अशी एकापेक्षा एक कलाकारांची फौज या चित्रपटात आहे.
 
या सगळ्यांनी मिळून अक्षरक्ष: कल्ला केला आहे. कोण्या एकाची मक्तेदारी न राहता सगळ्यांनी मिळून धमाल उडवून दिली आहे.
 
'अशी ही बनवाबनवी' प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान यश मिळवलं.
 
पैसा, घराचा आसरा यासाठी कराव्या लागणाऱ्या लढाईतूनही विनोद निर्मिती होऊ शकतो हा विचार बनवाबनवी चित्रपटाने दिला.
 
इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या काळातही हा स्ट्रगल कायम आहे. तो पार करताना अनेकांची तिशी उलटते. मात्र अशी ही बनवाबनवी हा चित्रपट तिशीतही संदर्भांसह चिरतरुण आणि खणखणीत आहे.
 
'धनंजय माने इथेच राहतात का?' मराठीतल्या ऑल टाइम हिट डायलॉगपैकी हा एक आहे.
 
हा चित्रपट एवढा हिट होण्यामागे अशोक सराफ आणि त्यांच्या सहकलाकरांची मेहनत असल्याचं सांगितलं जातं.
 
अशोक सराफ यांनी हिंदी चित्रपटातही अनेक भूमिका केल्या आहेत. हम पांच सारख्या मालिकांमधून ते छोट्या पडद्यावरही झळकले आहेत. त्यांनी केलेल्या भूमिका मराठी रसिकांच्या कायमच लक्षात राहिल्या आहेत.
 
येत्या 1 मे ला महाराष्ट्र दिनी हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येईल.

Published By- Priya Dixit 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

विवाहबंधनात अडकले गायक अरमान मलिक, लॉन्ग टाइम गर्लफ्रेंड आशना श्रॉफ सोबत घेतले सप्तपदी

अमृता खानविलकरच्या विलक्षण, सुदंर नृत्यानं घातली प्रेक्षकांना भुरळ, संगीत मानापमान मध्ये पाहुणी कलाकार म्हणून गाजवलं "वंदन हो" गाणं

दिग्दर्शक अनुराग कश्यपने मुंबई आणि बॉलिवूड सोडण्याचा घेतला निर्णय

सिकंदर' चित्रपटाचा टीझर रिलीज

वरुण धवनची मुलगी लाराची पहिली झलक आली जगासमोर

सर्व पहा

नवीन

विवाहबंधनात अडकले गायक अरमान मलिक, लॉन्ग टाइम गर्लफ्रेंड आशना श्रॉफ सोबत घेतले सप्तपदी

अमृता खानविलकरच्या विलक्षण, सुदंर नृत्यानं घातली प्रेक्षकांना भुरळ, संगीत मानापमान मध्ये पाहुणी कलाकार म्हणून गाजवलं "वंदन हो" गाणं

शेगाव गजानन महाराज मंदिर परिसरातील दर्शनीय स्थळे

New Year 2025 : या अद्भुत ठिकाणी नवीन वर्ष करा सेलिब्रेट

दिग्दर्शक अनुराग कश्यपने मुंबई आणि बॉलिवूड सोडण्याचा घेतला निर्णय

पुढील लेख
Show comments