Marathi Biodata Maker

रील 'मेकअप'मध्ये रिअल दुखापत

Webdunia
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020 (17:02 IST)
सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान अनेक किस्से घडत असतात. काही गंमतीदार असतात तर काही गंभीरही असतात. असाच एक गंभीर वजा गंमतीदार किस्सा गणेश पंडित दिग्दर्शित 'मेकअप' चित्रपटाच्या सेटवर घडला. या चित्रपटातील 'लागेना' या गाण्याचे इनडोअर शूटिंग सुरु होते. गाणे शूट झाल्यानंतर ते कसे झाले आहे, हे बघण्यासाठी चिन्मय उदगीरकर मॉनिटरजवळ गेला. तिथे बाजूलाच एक विटांची कमान बांधण्यात आली होती. नकळत चिन्मय त्या कमानीला टेकून उभा राहिला आणि ती कमान कोसळली. या अपघातात चिन्मयच्या डोक्याला आणि गणेश पंडित यांच्या खांद्याला बऱ्यापैकी दुखापत झाली. चिन्मयला त्या विटा डोक्यावर कोसळल्या याची जाणीव झाली मात्र त्याचे लक्ष गणेश पंडित यांच्याकडे असल्याने त्याने फारसे लक्ष दिले नाही. थोड्या वेळाने त्याच्या लक्षात आले, की आपल्या डोक्यातून रक्त वाहतेय. एका क्षणापुरता चिन्मय घाबरला. सेटवरच्या लोकांनी दोघांनाही दवाखान्यात नेले. गणेश यांच्यावर औषधोपचार केले तर चिन्मयला सहा टाके घातले. एवढं होऊनही त्यांची दवाखान्यात मजामस्ती सुरूच होती आणि मुख्य म्हणजे त्याच दिवशी गणेश आणि चिन्मय दोघेही पुढच्या दोन तासात सेटवर हजर होते आणि पुन्हा एकदा सेटवर मजामस्तीला सुरुवात झाली.
 
गणेश पंडित लिखित दिग्दर्शित 'मेकअप' हा सिनेमा येत्या ७ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. सोहम रॉकस्टार एंटरटेनमेंट, बाला इंडस्ट्रीज अँड एंटरटेनमेंट प्रा. लि., शेमारू एंटरटेनमेंट लि. आणि ग्रीन ॲपल मीडिया प्रस्तुत या चित्रपटाचे निर्माता दीपक मुकूट, बी. बालाजी राव, हिरेन गाडा, नीरज कुमार बर्मन, अमित सिंग आहेत तर केतन मारू, कलीम खान सहनिर्माता आहेत. या चित्रपटात रिंकू राजगुरू आणि चिन्मय उदगीरकर यांच्याव्यतिरिक्त प्रतीक्षा लोणकर, मिलिंद सफई, राजन ताम्हाणे, सुमुखी पेंडसे, स्वाती बोवलेकर, तेजपाल वाघ यांच्याही भूमिका आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

2026 मध्ये ‘मर्दानी 3’पासून राणी मुखर्जी साजरे करणार आपल्या शानदार कारकिर्दीची 30 वर्षे

इंडियन आयडल सीझन 3 चा विजेता प्रशांत तमांग यांचे निधन

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी त्यांच्या मुलाची पहिली झलक शेअर केली, त्याचे नाव सांगितले

ओ रोमियो' चा टीझर प्रदर्शित, शाहिद कपूर एका भयंकर अवतारात दिसला

धुरंधरच्या विक्रमी यशानंतर, रणवीर सिंग 'प्रलय' मध्ये झोम्बी अवतार साकारण्यास सज्ज

सर्व पहा

नवीन

बॉर्डर 2 : 23 जानेवारी 2026 रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार

भारतातील रहस्यमय मंदिरे जी रात्री उघडतात, जिथे अंधारात दर्शन घेणे एक अद्भुत क्षण

मराठी बिग बॉसचा विजेता शिव ठाकरे अडकला लग्न बंधनात

गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स 2026: 16 वर्षीय ओवेन कूपरने रचला इतिहास, पहा विजेत्यांची संपूर्ण यादी

या कारणामुळे अमरीश पुरी यांनी हॉलिवूड चित्रपटांचे ऑफर नाकारले

पुढील लेख
Show comments