Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

संपूर्ण महाराष्ट्रात गाजतोय 'बबन'

Webdunia
मंगळवार, 27 मार्च 2018 (11:52 IST)
सिनेमा सुपरहिट करण्यासाठी पडद्यावर ग्लॅमरची गरज नसते, हे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या आणि अल्पावधीतच सुपरहिट ठरलेल्या 'बबन' या सिनेमाने सिद्ध करून दाखविले आहे. द फोक कोनफ्लूअन्स इंटरटेंटमेंट प्रस्तूत, चित्राक्ष फिल्म्स निर्मित आणि भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे दिग्दर्शित 'बबन' हा सिनेमा २३ मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. ग्रामीण जीवनावर आधारित असलेल्या या सिनेमातील नायकाचा संघर्ष, आणि त्याची महत्वाकांक्षीवृत्ती प्रेक्षकांना भावली असल्यामुळे, सिनेमातील हा 'बबन' सर्वसामान्य प्रेक्षकांना आवडत आहे. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सिनेमा 'ख्वाडा' च्या घवघवीत यशानंतर भाऊरावांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमादेखील त्याच उंचीवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 'ख्वाडा' चा रांगडा अभिनेता भाऊसाहेब शिंदेच्या नैसर्गिक अभिनयामुळे 'बबन'च्या व्यक्तिरेखेत जिवंतपणा आला आहे. शिवाय गायत्री जाधव तसेच सिनेमातील इतर कलाकारांची भूमिका देखील वाखाणन्याजोगी आहे.
अल्पावधीतच लोकांचा भरभरून प्रतिसाद लाभलेल्या 'बबन'ला मोठी मागणी मिळत असल्यामुळे महाराष्ट्रात या सिनेमाचे शोज २०० हून २४० करण्यात आले आहेत. त्यामुळे खास प्रेक्षकांसाठी महाराष्ट्राच्या सिनेमागृहात 'बबन'चे ४०० हून ५०० शोज वाढवले गेले असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई बाहेरील सिनेमागृहात 'बबन' सिनेमाच्या तिकीट खिडकीवर हाऊसफुलची पाटी झळकताना दिसून येत असून, या तीन दिवसात बॉक्स ऑफिसवर ३.२५ करोडचा गल्लादेखील कमावला आहे.

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

पुढील लेख
Show comments