Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जोडी जुळवून देणाऱ्या 'गॅटमॅट'चा टीझर पोस्टर लाँच

Webdunia
असे म्हणतात की जोड्या स्वर्गात बनतात. परंतु या बनलेल्या जोड्यांचा 'गॅटमॅट' हा खालीच होत असतो. त्यामुळे, जोडी कितीही 'मेड फॉर इच अदर' असली तरी, त्यांचे पहिले एकत्र येणे अधिक महत्वाचे असते. अश्याच काहीश्या विषयावर आधारित 'गॅटमॅट' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यशराज इंडस्ट्रीजच्या सहयोगाने अवधूत गुप्ते यांची प्रस्तुती असलेल्या या सिनेमाच्या  टीझर पोस्टरचा नुकताच श्री गणेशा करण्यात आला. गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर लाँच झालेला हा टीझर पोस्टर प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे.
 
येत्या १६ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणाऱ्या, निशीथ श्रीवास्तव दिग्दर्शित आणि राजेंद्रप्रसाद श्रीवास्तव निर्मित, गॅटमॅट या सिनेमाच्या टीझर पोस्टरवर 'आम्ही जुळवून घेऊ' असे उपशिर्षक असून, दोन प्रेमदूतदेखील यात आपल्याला पाहायला मिळतात. शिवाय प्रेमी युगुलांचे सांकेतिक चिन्हदेखील आपल्याला यात दिसून येत असल्यामुळे, हा एक रोमेंटिक सिनेमा असल्याचा अंदाज प्रेक्षकांना येतो. या टीझर पोस्टरवरून सिनेमाच्या कास्टिंगबाबत कोणतीच माहिती मिळत जरी नसली तरी हा सिनेमा तरूणवर्गासाठी पर्वणी ठरणार आहे, हे नक्की.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

वीर मुरारबाजी चित्रपटाच्या निमित्ताने… अरुण गोविल, दीपिका चिखलिया एकत्र

कावेरी वडील शेखर कपूर यांच्या मासूम 2 चित्रपटात दिसणार

सीआयडी चाहत्यांना धक्का बसणार,एसीपी प्रद्युम्न शिवाजी साटम आता या शोला निरोप देणार

प्रसिद्ध अभिनेता आयुष्यमान खुरानाच्या पत्नीची पुन्हा कर्करोगाशी झुंज

सुपरस्टार जितेंद्रच्या एका कटू शब्दाने त्यांचे आणि रेखा यांच्यातील नाते आले होते संपुष्टात

सर्व पहा

नवीन

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराविरुद्ध जामीनपात्र वॉरंट जारी

'दक्षिण कैलास' नावाने ओळखले जाणारे शंभू महादेव शिखर शिंगणापूर

ग्राउंड झिरो निर्मात्यांनी ट्रेलरपूर्वी शेअर केला धमाकेदार पोस्टर रिलीज

CID मालिका मध्ये एसीपी प्रद्युमनच्या जागी दिसणार हा सुपरहॉट अभिनेता?

प्रसिद्ध अभिनेता आयुष्यमान खुरानाच्या पत्नीची पुन्हा कर्करोगाशी झुंज

पुढील लेख
Show comments