Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सुपरहीट 'ख्वाडा', 'बबन' नंतर भाऊराव घेऊन येताहेत 'हैद्राबाद कस्टडी'

Webdunia
सोमवार, 6 ऑगस्ट 2018 (13:19 IST)
सुपरहिट 'बबन' नंतर द फोक कोनफ्लूअन्स इंटरटेंटमेंट प्रस्तूत आणि चित्राक्ष फिल्म्स निर्मितीसंस्था एका नव्या कोऱ्या चित्रपटाच्या तयारीला लागली आहे. भाऊराव कऱ्हाडे यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाचे नाव 'हैद्राबाद कस्टडी' असे असून, सोशल नेट्वर्किंग साईटवर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझर पोस्टरद्वारे त्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. या सिनेमाच्या नावावरून आणि टीझर पोस्टरवरून हा सिनेमा पोलीस कोठडी आणि कैद्यांवर आधारित असल्याचा अंदाज येतो. शिवाय, या सिनेमाच्या टीझर पोस्टरवर, थर्ड डिगरीसाठी वापरण्यात येणारा पट्टादेखील पाहणाऱ्याचे लक्ष वेधून घेत आहे. इतकेच नव्हे तर, हैद्राबाद कस्टडी असे या सिनेमाचे नाव असल्याकारणामुळे, हा चित्रपट नेमका कशावर आधारित आहे? असा प्रश्नदेखील प्रेक्षकांना पडत आहे.
 
ग्रामीण आणि वास्तविक समस्येवर सिनेमाच्या माध्यमातून भाष्य करणारा दिग्दर्शक म्हणून भाऊराव कऱ्हाडे यांना ओळखले जाते. 'ख्वाडा', आणि 'बबन' हे दोन्ही सिनेमे याच धाटणीचे असल्यामुळे त्यांचा आगामी 'हैद्राबाद कस्टडी' हा सिनेमा, सिनेरसिकांसाठी कुतूहलाचा विषय ठरत आहे. या सिनेमाची विठ्ठलराव नानासाहेब कऱ्हाडे, प्रमोद भास्कर चौधरी, मोनाली संदीप फंड, भाऊसाहेब शिंदे, रजनीकांत सदाशिव निमसे आणि सुशीला कानडे यांनी या सिनेमाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे. तूर्तास, या सिनेमाविषयी आणखीन कोणतीच माहिती समोर आली नसली तरी, लवकरच या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असल्याचे सांगितले जात आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मी स्वतःला बाथरूममध्ये बंद करून खूप रडायचो ,शाहरुख खान अपयशावर बोलले

War 2 :हृतिक रोशनच्या 'वॉर 2 मध्ये या प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री!

Baaghi 4: बागी 4' चा फर्स्ट लूक आऊट, चित्रपट या दिवशी रिलीज होणार

चित्रपटातील प्रसिद्ध खलनायकाचे निधन, या चित्रपटात शेवटचे दिसले होते

अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2: द रुलचा धमाकेदार ट्रेलर रिलीज

सर्व पहा

नवीन

दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टची तिकिटे काही मिनिटांतच विकली,मुंबईत या तारखेला आहे कॉन्सर्ट

अनुपमा'च्या सेटवर विजेचा धक्का लागल्याने कॅमेरा असिस्टंटचा मृत्यू, निर्माता म्हणाले-

प्राचीन भीष्मकनगर किल्ला अरुणाचल प्रदेश

धनुष-ऐश्वर्या रजनीकांत होणार वेगळे, घटस्फोटाचा निर्णय या दिवशी येणार

भारतात असलेले महाभारतातील खलनायकांचे मंदिर

पुढील लेख
Show comments