Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'माझा अगडबम'चे दमदार शीर्षकगीत लॉच

 माझा अगडबम चे दमदार शीर्षकगीत लॉच
Webdunia
बुधवार, 5 सप्टेंबर 2018 (14:37 IST)
नावापुरतीच नाजूक आणि शरीराने अगडबम असलेल्या, महाराष्टाच्या लाडक्या 'नाजुका'च्या दमदार पुनरागमनाची चर्चा सर्वत्र रंगात आली आहे. सुपरहिट 'अगडबम' च्या सिक्वेलमधून ती पुन्हा येत असल्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. 'पेन इंडिया लिमिटेड कंपनी'चे जयंतीलाल गडा आणि तृप्ती भोईर फिल्म्स प्रस्तुत 'माझा अगडबम' असे या सिक्वेलचे नाव असून, नुकतेच या सिनेमाचे शीर्षकगीत सोशल नेटवर्किंग साईटवर लाँच करण्यात आले. नाजुकाच्या व्यक्तिमत्वाला साजेल असे हे शीर्षकगीत प्रेक्षकांचे भरघोस मनोरंजन करत आहे.
 
'आसमान का थरथरते...' असे बोल असलेले हे शीर्षकगीत इतके दमदार आहे कि, ऐकताना प्रत्येकाच्या अंगात अनोखे स्फुरण संचारते. मंगेश कांगणे यांनी शब्दबद्ध केलेल्या या एनर्जेटीक गाण्याला टी. सतीश चक्रवर्ती यांचे प्रभावी संगीत लाभले आहे. शिवाय अपेक्षा दांडेकरच्या दमदार आवाजामुळे हे गाणे अधिकच वजनदार बनले आहे. गुणी अभिनेत्री तृप्ती भोईरवर चित्रित करण्यात आलेले हे शीर्षकगीत प्रेक्षकांना ठेका धरण्यास भाग पाडते.
 

'माझा अगडबम' या सिनेमात गुणी अभिनेत्री तृप्ती भोईरची प्रमुख भूमिका असून, दिग्दर्शक, लेखक आणि निर्माती अश्या चार वेगवेगळ्या भूमिकेमधून ती लोकांसमोर येणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत मराठीचा सुप्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाच्या निर्मितीफळीत तृप्ती भोईरला टी. सतीश चक्रवर्ती, धवल जयंतीलाल गडा आणि अक्षय जयंतीलाल गडा यांची साथ लाभली असून, रेश्मा कडाकिया, कुशल कांतीलाल गडा आणि नीरज गाला यांनी सहनिर्मात्यांची धुरा सांभाळली आहे. 'अगडबम' च्या दमदार यशानंतर डबल धमाका करण्यास येत असलेला हा 'माझा अगडबम' येत्या २६ ऑक्टोबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Rani Mukerji: व्यावसायिक चित्रपटांव्यतिरिक्त राणी मुखर्जीने साकारल्या या भूमिका

चंदू चॅम्पियनसाठी कार्तिक आर्यन महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित

'टेस्ट' चित्रपटाचा नवीन टीझर प्रदर्शित, आर माधवनची व्यक्तिरेखा उघड

Orry वर वैष्णोदेवी बेस कॅम्पमध्ये दारू पिल्याचा आरोप, मंदिराजवळ दारू आणि मांसाहारी पदार्थांच्या विक्रीवर २ महिन्यांसाठी बंदी

‘ये रे ये रे पैसा ३’ चित्रपट १८ जुलैला होणार प्रदर्शित

सर्व पहा

नवीन

इमरान हाश्मीची पत्नी परवीन त्याला तिच्यासाठी अनलकी मानते, कारण जाणून घ्या

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आई आयसीयूमध्ये दाखल

नवऱ्याची २१ कर्तव्ये

Sikandar Trailer: सिकंदर'चा ट्रेलर प्रदर्शित, चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता

Gharapuri Island: घारापुरी बेट प्राचीन बारा ज्योर्तिलिंग

पुढील लेख
Show comments