Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'निळावंती' ती येतिय... उत्कंठावर्धक पोस्टर प्रदर्शित

Webdunia
बुधवार, 25 ऑक्टोबर 2023 (17:09 IST)
चित्रपटसृष्टीमध्ये नेहमीच वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट पाहायला मिळतात. आता 'निळावंती' चित्रपटाचे पोस्टर समोर आले आहे. पोस्टर पाहून हा थरारक चित्रपट असल्याचे लक्षात येतेय. पोस्टरमध्ये एक स्री हातात कंदील घेऊन जंगलात चालताना दिसत आहे. ती येतिय... या टॅगलाईनचा नेमका अर्थ काय? हा प्रश्न अनेकांच्या मनात चलबिचल करत आहे .याव्यतिरिक्त पोस्टरमध्ये असलेली ती पाठमोरी अभिनेत्री नक्की कोण आहे, याची उत्सुकताही प्रेक्षकांना लागली आहे. 'निळावंती' हा एक ग्रंथ आहे. या ग्रंथाबद्दल फार क्वचित लोकांना माहित आहे.

हा ग्रंथ कोणी सहसा वाचत नाही कारण अनेक अफवा या ग्रंथाबद्दल पूर्वी पसरल्या होत्या. या सर्व गोष्टी सत्य घटनेवर आधारित आहेत की नाही त्याचीच संपूर्ण कथा आता आपल्या समोर चित्रपटाच्या माध्यमातून सचिन दाभाडे दाखवणार आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून 'निळावंती' राक्षसी की दैवी रूप आहे, ही अफवा आहे की सत्य या अनेक गूढ गोष्टींचे रहस्य उलगडणार आहे. लेखक, दिग्दर्शक सचिन दाभाडे म्हणतात, " लवकरच `निळावंती` चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तुम्हाला दिग्गज कलाकार पाहायला मिळणार आहेत. लवकरच त्यांचा चेहरा माध्यमांसमोर येईल. ज्या व्यक्तींना `निळावंती` ग्रंथाबद्दल माहित असेल त्या व्यक्तींसाठी त्याची पूर्ण माहिती चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. अनेक लोकांना हा शब्द देखील नवीन असेल त्यांना देखील याबद्दल जाणून घेण्याची आवड निर्माण होईल, अशी ही गूढ कथा आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

सर्व पहा

नवीन

ओ स्त्री रक्षा करना, राजकुमार राव-श्रद्धा कपूरचा Stree 2 चा टीजर रिलीज

Indian 2 Trailer: भ्रष्टाचाराचा नायनाट करण्यासाठी 'इंडियन 2' येत आहे,ट्रेलर रिलीज

'या' ठिकाणी गणपतीची सर्वात उंच मूर्ती आहे, जगभरातून लोक भेट द्यायला येतात

मिर्झापूरचा चुनारगड किल्ला रहस्य आणि साहसाने भरलेला

पायरेट्स ऑफ द कॅरेबियन फेम अभिनेत्याचे निधन

पुढील लेख
Show comments