Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'तोडफोड' मुग्धा कऱ्हाडे

 तोडफोड  मुग्धा कऱ्हाडे
Webdunia
बुधवार, 3 ऑक्टोबर 2018 (14:25 IST)
'गोल गोल केक, त्याची क्रीम गोड गोड' म्हणत महाराष्ट्रातल्या तमाम'बॉईज'ना 'तोडफोड' नाचवणारी गायिका मुग्धा कऱ्हाडेचा आयटम साँग सध्या चांगलच गाजत आहे. आगामी 'बॉईज २' सिनेमातील हे गाणे मुग्धाने संपूर्णतः नाकातून गायले आहे. मराठी मनोरंजन सृष्टीत आयटम सॉंग करण्याचा मुग्धाचा पहिलाच प्रयत्न भरघोस यशस्वी ठरला आहे. याबद्दल बोलताना ती सांगते, 'जेव्हा अवधूत गुप्तेने या गाण्याची मला चाल सुनावली, तेव्हा हे गाणे एका वेगळ्याच पठडीतले आहे याची जाणीव झाली. अवधूतबरोबर मी अनेक गायनाचे कार्यक्रम केले आहेत, तसेच काही सिनेमातील गाण्यांचे पार्श्वगायनदेखील केले आहे. मात्र, हे गाणे संपूर्णतः नाकातून गाण्याचा माझा हा पहिलाच प्रयन्त आहे.'
 
मुग्धाने अवधूत गुप्ते दिग्दर्शित 'एक तारा' या चित्रपटातील 'विसर तू' गाण्याद्वारे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते, विशेष म्हणजे या गाण्यासाठी तिला मिरची अवॉर्ड्सने गौरविण्यातदेखील आले. त्यानंतर मुग्धाने  'तेरे बिन मरजावा' आणि 'मंत्र' या चित्रपटामध्ये पार्श्वगायिका म्हणून काम केले आहे.
 
मॅकेनिकल इंजिनियरिंगचे शिक्षण घेतलेली मुग्धा सध्या एल अँड टी कंपनीमध्ये कार्यरत आहे.तिचे हे क्षेत्र गायनापासून अगदीच वेगळं असलं तरी अगदी लहानपणापासूनच मुग्धा गायनाचं प्रशिक्षण घेत होती.

त्यानंतर, सुरेश वाडकर यांच्या 'आजिवासन' या नामांकित स्टुडिओमधून साऊंड इंजिनियरिंगचे प्रशिक्षदेखील घेतले. शिवाय याच स्टुडिओत काही काळ नोकरी करत तिने संगीताची आपली आवड कायम झोपासली. अवधूत गुप्ते आणि मुग्धा कऱ्हाडे हि मावस भावंडे असल्याकारणामुले ते दोघंही बालपणापासून एकत्र गाण्याचा रियाज करत असत. या जोडगोळीने अनेक लाईव्ह शोज तसेच गायनाचे बैठकी कार्यक्रमदेखील केले आहेत. मराठी इंडस्ट्रीमध्ये ही कलाकार जोडी गेल्या साडेतीन वर्षांपासून एकत्र काम करत आहेत.
 
इरॉस इंटरनेशनल आणि एवरेस्ट इंटरटेंटमेन्ट प्रस्तुत, अवधूत गुप्ते यांच्या सहयोगाने सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रोडक्शनअंतर्गत प्रदर्शित होत असलेला हा 'बॉईज २' हा सिनेमा येत्या ५ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतिक लाड यांची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाचे विशाल देवरुखकर याने दिग्दर्शन केले असून, ऋषिकेश कोळीने संवादलेखन केले आहे. 'बॉईज २' चे लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे आणि संजय छाब्रिया निर्माते असून, इरॉस इंटरनेशनलद्वारे या चित्रपटाचे जागतिक स्तरावर वितरण देखिल केले जाणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दीपिका पदुकोण कल्की 2898 एडी भाग 2 च्या शूटिंगसाठी सज्ज

स्त्री 3' मध्ये अक्षय कुमारची एंट्री निश्चित झाली

स्काय फोर्स चित्रपटाचा अप्रतिम ट्रेलर रिलीज, अक्षय कुमार-वीर पहाडियाचा ॲक्शन अवतार दिसला

सोनू निगमची मराठमोळी सुरुवात,आपल्या सुमधुर आवाजाने गायलं २०२५ चं पहिलं गाणं ‘चंद्रिका’

Kangana Ranaut: या दिवशी रिलीज होणार 'इमर्जन्सी'चा ट्रेलर

सर्व पहा

नवीन

नीना गुप्ता यांची नात आणि मसाबा गुप्ता यांच्या मुलीचे नाव जाहीर

कोरठण खंडोबा Korthan Khandoba

हृतिक रोशनच्या 'कहो ना प्यार है' चित्रपटाला बॉलिवूडमध्ये झाले 25 वर्षे पूर्ण

Makar Sankranti पवित्र पर्वावर देशातील या पाच शहरांना भेट द्या

कहो ना प्यार है'च्या स्क्रिनिंगला अमीषा पटेलने हजेरी लावली

पुढील लेख
Show comments