Marathi Biodata Maker

रहस्यमयी 'मिरांडा हाऊस'

Webdunia
शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019 (10:01 IST)
सध्या मराठीमध्ये  वेगवेगळ्या विषयांवर अनेक चांगले चित्रपट येत आहेत. सोबतच मराठी चित्रपटामध्ये खूप चांगले प्रयोगही होत आहेत. अशाच एका वेगळ्या विषयावर आधारित 'मिरांडा हाऊस' या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्रसिद्ध दिगदर्शक राजेंद्र तलक यांनी दिग्दर्शित केला असून इरिस प्रॉडक्शन हाऊसने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. राजेंद्र तलक यांनी याआधी 'अ रेनी डे', 'सावरिया. कॉम', 'सावली' हे वेगळ्या धाटणीचे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. 'मिरांडा हाऊस' या चित्रपटाच्या निमित्ताने राजेंद्र तलक पुन्हा नवीन विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या चित्रपटात  मिलिंद गुणाजी, पल्लवी सुभाष, साईंकित कामत हे त्रिकुट दिसणार आहे. या चित्रपटाचा टिझर पाहिला तर टिझरमध्ये पल्लवी सुभाष आणि साईंकित कामत बंदूक ताणून उभे आहेत. तर दुसऱ्या दृश्यात पल्लवी सुभाष कोणाच्यातरी  मिठीत दिसत आहे. ही दोन विरोधी दृशे पाहिल्यावर चित्रपट नक्की कशावर आधारित आहे, याचा अंदाज येत नाही, मात्र हा चित्रपट नक्कीच वेगळा, मनोरंजक आणि रहस्यमय असणार हे नक्की. याआधी देखील अनेक रहस्यमय चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. पण 'मिरांडा हाऊस' हा चित्रपट या सगळ्यामध्ये नक्की वेगळा असेल यात शंका नाही. शिवाय अनेक दिवसांनी पल्लवी सुभाष, मिलिंद गुणाजी मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. तर मग तयार राहा एका नवीन आणि रहस्यमय चित्रपटासाठी. 'मिरांडा हाऊस' हा चित्रपट येत्या १९ एप्रिलला प्रदर्शित होत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

६७ वर्षीय मुकेश खन्ना यांनी अद्याप लग्न का केले नाही याचा खुलासा केला

पति पत्नी और वो दो' चा ट्रेलर रिलीज, आयुष्मान खुराना तीन सुंदरींमध्ये अडकला

एव्हलिन शर्माचा ५ वर्षांनंतर विवाह संपुष्टात आला, पती तुशान भिंडीपासून घटस्फोटासाठी अर्ज दाखल करणार

Funny सूर्याचे आजोळ अकोल्याचे

सलमान खानची रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटात दमदार भूमिका, त्याने स्वतः या भूमिकेसाठी विचारणा केली होती

सर्व पहा

नवीन

'रामायण'मधील रामाने अयोध्येत मोठी गुंतवणूक केली, रणबीर कपूरने कोट्यवधी रुपयांचा भूखंड खरेदी केला

दिल्ली पोलिसांनी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर 'द स्किन डॉक्टर' यांना अटक केली; संजय कपूर यांच्या मृत्यूशी जोडले आहे प्रकरण

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांची लेक अडकली लग्नबंधनात

दिलजीत दोसांझच्या मॅनेजरच्या घरावर गोळीबार, लॉरेन्स बिश्नोई टोळीने सोशल मीडियावर जबाबदारी स्वीकारली

Weekend Trip दोन दिवसात फिरता येतील असे महाराष्ट्रातील रमणीय ठिकाणे

पुढील लेख
Show comments