Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'वन्स अ ईअर' मध्ये निपुणचे सहा वेगळे लुक्स

Webdunia
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019 (15:35 IST)
भारताचा लोकप्रिय स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म असलेल्या एमएक्स प्लेयरवर मंदार कुरुंदकर दिग्दर्शित 'वन्स अ ईअर' ही मराठी ओरिजनल्स वेबसिरीज सुरु झाली असून या वेबसिरीजला प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसादही मिळत आहे. निपुण धर्माधिकारी आणि मृण्मयी गोडबोले यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या या वेबसिरीजमध्ये त्यांच्या सहा वर्षांच्या नात्यात प्रत्येक टप्प्यावर आलेले वेगळे वळण दाखवण्यात आले आहे. 
 
बराच काळ अभिनयापासून दूर राहिलेला निपुण या वेबसिरीजच्या निमित्ताने आपल्या समोर येत आहे. यात निपुणचा अठरा ते तेवीस वर्षांपर्यंतचा प्रवास दाखवला असून त्याचे सहा वेगळे लुक्स यात आपल्याला पाहायला मिळतील. या लुक्सबाबतचाच एक मजेदार किस्सा निपुणने शेअर केला आहे. तो म्हणतो, ''या सहा वर्षांच्या कालावधीत माझे सहा वेगळे लुक्स दाखवण्यात आले आहेत. शिवाय ते नैसर्गिक दिसणेही तितकेच महत्वाचे होते. त्यामुळे शुटिंगचे शेड्युलही तसेच केले होते. आधी दाढी, मग मिशी आणि शेवटी तुकतुकीत दाढी (क्लीन शेव्ह) अशा क्रमाने चित्रीकरण करण्यात आले. ज्यावेळी माझा शेवटचा लूक केला तेव्हा मी स्वतःला बघून घाबरलोच. कारण बऱ्याच काळात मी स्वतःला असे बघितले नव्हते. 
 
त्यामुळे मलाच एक भीती होती मी स्क्रीनवर कसा दिसेन? मात्र मंदारला माझा हाच लूक हवा होता. या भूमिकेसाठी मी वजनही कमी केले. विशेष म्हणजे या वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत मी एकदाही वजन तपासले नाही. माझे आठ- दहा वर्षांपूर्वीचे काही कपडे मी ठेवले होते. जे मला आता व्हायला लागले, यावरून मला कळले, की माझे वजन कमी झाले आणि आवर्जून सांगावी अशी एक गोष्ट म्हणजे या काळात मला हे सुद्धा नव्याने कळले, की माझ्या बायकोला डाएटचे पदार्थ इतके छान बनावता येतात.'' 
 
सहा भागांची 'वन्स अ ईअर' ही वेबसिरीज तुम्हाला एमएक्स प्लेयरवर विनामूल्य पाहता येईल.

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

Met Gala 2024 : 1965 तासात तयार झाली आलियाची सुंदर साडी, 163 कारागिरांनी योगदान दिले

सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी पाचव्या आरोपीला अटक

Tourist attraction पर्यटकांचे आकर्षण: बोर व्याघ्र प्रकल्प

रिॲलिटी शोमध्ये करण जोहरला रोस्ट केले, चित्रपट निर्माता संतापला

सिद्धयोगी मकरंद देशपांडे‘अल्याड पल्याड’ चित्रपटात दिसणार वेगळ्या भूमिकेत

पुढील लेख
Show comments