Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पांघरुण’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर; ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीस

Webdunia
सोमवार, 27 डिसेंबर 2021 (15:27 IST)
आपल्या सुमधुर संगीतामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा महेश मांजरेकर यांचे दिग्दर्शन असलेला आणि झी स्टुडिओजची प्रस्तुती असलेला ‘पांघरुण’ हा चित्रपट येत्या 11 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अमोल बावडेकर गौरी इंगवले रोहित फाळके विद्याधर जोशी सुरेखा तळवलकर हे कलाकार या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत.
महेश मांजरेकर आणि झी स्टुडिओज यांच्या यशाचं एक वेगळं समीकरण आहे. काकस्पर्श,नटसम्राट यांसारख्या उत्तमोत्तम आणि यशस्वी कलाकृती हे याचं उदाहरण. आता हेच समीकरण पांघरुणमधूनही प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. स्वातंत्र्यपूर्वीचा काळ, कोकणाचं निसर्गसौंदर्य आणि तिथे घडणारी एक विलक्षण प्रेमकहाणी यामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा सांगितिक ट्रेलरला (म्युझिकल ट्रेलर) प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. हितेश मोडक, डॉ. सलील कुलकर्णी, पवनदीप राजन आणि अजित परब यांचं संगीत आणि वैभव जोशी यांच्या शब्दांनी सजलेल्या या गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं. ही अनोखी गाठ आणि इलुसा हा देह या गाण्यांना तर सोशल मीडियावर लाखो व्ह्यूव्ज मिळाले.
 
11 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला!
अनेक चित्रपट महोत्सवासाठीही या चित्रपटाची निवड झाली. 18व्या थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिव्हल, 28व्या ऑस्टिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, मामी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये पांघरुण चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली. बंगळुरु आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात चित्रभारती इंडियन सिनेमा कॉम्पिटेशन या विभागात सर्वोकृष्ट भारतीय चित्रपट हा मानाचा पुरस्कारही पांघरुणने पटकावला. चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी सांगितले की , “एखादी कलाकृती अशी असते की ती त्या दिग्दर्शकासाठी अतिशय जवळची असते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

विवाहबंधनात अडकले गायक अरमान मलिक, लॉन्ग टाइम गर्लफ्रेंड आशना श्रॉफ सोबत घेतले सप्तपदी

अमृता खानविलकरच्या विलक्षण, सुदंर नृत्यानं घातली प्रेक्षकांना भुरळ, संगीत मानापमान मध्ये पाहुणी कलाकार म्हणून गाजवलं "वंदन हो" गाणं

दिग्दर्शक अनुराग कश्यपने मुंबई आणि बॉलिवूड सोडण्याचा घेतला निर्णय

सिकंदर' चित्रपटाचा टीझर रिलीज

वरुण धवनची मुलगी लाराची पहिली झलक आली जगासमोर

सर्व पहा

नवीन

कहो ना प्यार है' पुन्हा रिलीज झाल्याने 25 वर्षांनंतर ही हृतिक रोशनची जादू कायम राहणार का?

Kangana Ranaut: या दिवशी रिलीज होणार 'इमर्जन्सी'चा ट्रेलर

भारतातील अद्भुत ठिकाणे जी रात्री अंधारात तेजोमय दिसतात

अक्षय कुमारच्या 'भूत बांगला' या हॉरर कॉमेडी चित्रपटाचे पुढील शूटिंग जयपूरमध्ये सुरू

शांत आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळ बडा बाग जैसलमेर

पुढील लेख
Show comments