Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

PATALA TAR GHYA - पैसे कमवण्यासाठी पुष्कर श्रोत्री करायचे ‘हे’ काम

Webdunia
गुरूवार, 16 फेब्रुवारी 2023 (17:44 IST)
नाटक, सिनेमा, मालिका, सूत्रसंचालन अशा विविध माध्यमांमधून घराघरांत पोहोचलेले पुष्कर श्रोत्री यांनी आपल्या आयुष्यातील एक गुपित सगळ्यांसमोर उघड केलं आहे. खरं तर कलाकारांच्या आयुष्याबद्दल जाणून घेण्याची त्यांच्या चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते. त्यातही हे कलाकार फवल्या वेळात काय करतात, असा प्रश्न नेहमीच अनेकांना पडतो. पुष्कर श्रोत्री यांनी याच रहस्याचा उलगडा प्लॅनेट मराठीवरील 'पटलं तर घ्या विथ जयंती' या टॉक शोमध्ये केला आहे. पुष्कर हे फावल्या वेळात रिक्षा चालवायचे आणि त्यातून पैसे कमवायचे. आता ते असं का करायचे, यामागचं मुख्य कारण काय? याचे उत्तर तुम्हाला शुक्रवारी म्हणजेच १७ फेब्रुवारी रोजी मिळणार आहे.
 
यावेळी या शोमध्ये पुष्कर श्रोत्री यांच्यासोबत संदीप पाठकही आहेत. ‘आपल्या देशाचं कालचं, आजचं आणि उद्याचं राजकारणही रस्ते देऊ, पाणी देऊ आणि वीज देऊ याभोवतीच फिरणार आहे. यातून आपण कधी बाहेर पडणार आहोत, असा प्रश्न या शोमध्ये संदीप पाठक यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे यंदाच्या एपिसोडमध्ये वातावरणात थोडं गांभीर्य येणार आहे. या भागात पुष्कर आणि संदीप यांनी त्यांच्या कारकिर्दीतील काही धमाल किस्से शेअर केले आहेत. सोबतच सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवरही आपली परखड मतं व्यक्त केली आहेत. त्यामुळे यावेळचा 'पटलं तर घ्या विथ जयंती'चा भाग जबरदस्त असणार हे नक्की !
Published By -Smita Joshi 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मी स्वतःला बाथरूममध्ये बंद करून खूप रडायचो ,शाहरुख खान अपयशावर बोलले

War 2 :हृतिक रोशनच्या 'वॉर 2 मध्ये या प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री!

Baaghi 4: बागी 4' चा फर्स्ट लूक आऊट, चित्रपट या दिवशी रिलीज होणार

चित्रपटातील प्रसिद्ध खलनायकाचे निधन, या चित्रपटात शेवटचे दिसले होते

अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2: द रुलचा धमाकेदार ट्रेलर रिलीज

सर्व पहा

नवीन

दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टची तिकिटे काही मिनिटांतच विकली,मुंबईत या तारखेला आहे कॉन्सर्ट

अनुपमा'च्या सेटवर विजेचा धक्का लागल्याने कॅमेरा असिस्टंटचा मृत्यू, निर्माता म्हणाले-

प्राचीन भीष्मकनगर किल्ला अरुणाचल प्रदेश

धनुष-ऐश्वर्या रजनीकांत होणार वेगळे, घटस्फोटाचा निर्णय या दिवशी येणार

भारतात असलेले महाभारतातील खलनायकांचे मंदिर

पुढील लेख
Show comments