Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर मांडणार शेतकऱ्यांच्या कुटुंबाची व्यथा!

Webdunia
सोमवार, 20 जून 2022 (07:30 IST)
भारत देश हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो.शेतकरी संपूर्ण देशाला अन्न देतो पण त्याच्या घरचं ताट पंचपक्क्वनाने कधी भरत नाही. कर्जाच्या जाळ्यात अडकलेला शेतकरी शेवटी आत्महत्या करतो आणि स्वतःच्या आयुष्याचा शेवट करतो परंतु त्या शेतकऱ्याच्या मागे त्याच्या कुटुंबाचे हाल होत असतात. अतिशय हलाखीच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याचं कुटुंब आपला उदरनिर्वाह करत असतो. स्वतःच्या पतीने आत्महत्या केली असल्याने सोनी मराठी वाहिनीवरील कोण होणार करोडपती’ या मंचावरून जळगावच्या ललिता जाधव सगळ्यांना सांगू इच्छितात की आत्महत्या हा मार्ग नाही तर ती अजून एक मोठी अडचण आहे.
 
मुलांच्या शैक्षणिक खर्चासाठी जळगावच्या ललिता कोण होणार करोडपती या खेळात सहभागी झाल्या आहेत.बुधवारी २२ जून रोजी ललिता या हॉटसीटवर येणार आहेत . ललिता यांना मुलांच्या शिक्षणासाठी पैसे साठवायचे आहेत. ललिता या अंगणवाडी शिक्षिका आहेत. त्या आधी सेविका म्हणून काम करत होत्या पण त्यांना स्वतःची प्रगती करायची होती. म्हणून त्यांनी लग्नानंतर अजून शिक्षण घ्यायचे ठरवले. परंतु घरची परिस्थिती बेताची असल्याने कधी ओवाळणीतून किंवा अजून कुठून जर पैसे भेट म्हणून मिळाले तर ते पैसे त्या जपून ठेवत आणि लागतील तसे ते पैसे शिक्षणासाठी वापरत. असे करून त्यांनी एम.ए. केले आणि त्या शिक्षिका झाल्या.
 
ललिता यांचे लग्न एका सर्वसाधारण शेतकरी कुटुंबात झाले. त्यामुळे सासरी देखील पैशाची अडचण कायम असायची. कधी हवामान साथ देत नाही तर कधी पिकाला हवा तो भाव मिळत नाही. म्हणून कायम हातात जेमतेम पैसा असे. या सगळ्या मुळे कर्ज घेण्याची वेळ आली पण आता ते कर्ज फेडणार कसे. फेडण्याचा काही मार्ग दिसला नाही म्हणूनललिता यांच्या पतीने कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली आणि ललिता आणि मुलांना सोडून निघून गेले. त्यानंतरचा खडतर प्रवास ललिता यांनी एकटीने केला. ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमात येऊन त्या त्यांच्या मुलांचं भविष्य सुधारू इच्छितात त्याचबरोबर शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्याचा त्यांचा उद्देश आहे. पाहायला विसरु नका ‘कोण होणार करोडपती २२ जून बुधवार रोजी ‘ रात्री ९ वाजता. आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

Chitrakoot Mountains आश्चर्यकारक चित्रकूट पर्वत

तारक मेहता फेम अभिनेता गुरुचरण सिंग सोढी विमानतळावरून बेपत्ता, तक्रार दाखल

शेगाव गजानन महाराज मंदिर परिसरातील दर्शनीय स्थळे

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बेबी बंबचे रेखाने घेतले चुंबन, सोशल मीडियावर व्हिडीओ वायरल

Salman Khan Firing Case: सलमानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणातील आरोपींना 29 एप्रिलपर्यंत कोठडी

पुढील लेख
Show comments