Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रभात टॉकीज बंद होणार?

Webdunia
सोमवार, 25 ऑक्टोबर 2021 (20:14 IST)
इंदूरचे संस्थानिक रामचंद्र किबे यांनी आपली पत्नी लक्ष्मी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ चित्रपटगहाचे ‘किबे लक्ष्मी थिएटर’ असे नामकरण केले होते. मराठी चित्रपटांची मुहूर्तमेढ रोवणार्या प्रभात फिल्म कंपनीच्या विष्णूपंत दामले, एस. फत्तेलाल, व्ही शांताराम, केशवराव धायबर, सीताराम बी. कुलकर्णी या खंदया शिलेदारांनी हे चित्रपटगृह चालवण्याची जबाबदारी उचलली. प्रभात फिल्म कंपनीवरून या चित्रपटगृहाचे ‘प्रभात’ असे नामकरण करण्यात आले. प्रभात म्हटले की अयोध्येचा राजा, संत तुकाराम, रामशास्त्री, संत एकनाथ, माणूस, शेजारी अशा अनेक दर्जेदार कलाकृतींची श्रृंखला डोळ्यासमोर येते. 
 
या भागीदारांपैकी विष्णुपंत दामले यांचे नातू विवेक दामले यांनी काही काळ या चित्रपटगृहाचे व्यवस्थापन सांभाळले. परंतु चित्रफटगृहाच्या कराराची मुदत संपुष्टात आल्यामुळे हे चित्रपटगृह 10 जानेवारी 2015 मध्ये त्यांनी सरदार किबे यांचे नातू अजय किबे यांच्याकडे हस्तांतरीत केले. त्यानंतर किबे थिएटर सुरेश आणि अजय किबे या बंधूंनी चालवायला घेतले. परंतु दुर्देवाने तीन महिन्यांपूर्वी त्यांचे निधन झाल्याने हे थिऐटर चालवायचे कसे हा प्रश्न अजय किबे यांना पडला आहे. त्यामुळे एकतर हे थिएटर कायमस्वरूपी बंद करायचे किंवा पुन्हा करारावर चालविण्यास द्यायचे असे दोनच पर्याय त्यांच्यासमोर आहेत. दुर्देवाने किबे थिएटर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला तर भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदविले गेलेले हे ‘प्रभात पर्व’ काळाच्या पडद्याआड जाणार आहे. 

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

आलियाच्या आईला आला स्कॅमचा फोन, पैसे उकळण्याचा प्रयत्न

उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही कुटुंबासोबत प्रवास करण्याचा विचार करत असाल तर ही ठिकाणे सर्वोत्तम आहेत

प्रसिद्ध अभिनेत्याने पत्नीच्या आठवणीत केली आत्महत्या, अपघातात झाला होता पत्नीचा मृत्यू

Gurucharan Singh: तारक मेहताचा 'रोशन सोढी 25 दिवसांनी घरी परतले

भूमी पेडणेकरने फॅशनला बनवला तिचा आत्मविश्वास, म्हणाली-

पुढील लेख
Show comments