rashifal-2026

प्रेमाला जात नसते मांडणारे स्टार प्रवाहचे ‘पुढचे पाऊल’

Webdunia
बुधवार, 21 डिसेंबर 2016 (17:36 IST)
स्टार प्रवाहवरच्या ‘पुढचे पाऊल’ या मालिकेत सध्या सुरु असलेल्या एपिसोडिक कथेने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.अक्कासाहेबांच्या कोल्हापुरात सत्यजित  आणि तेजस्विनीची बहरणारी ही प्रेमकथा वेगळी आहे.
 
कोणी कोणाची जात पाहुन, कोणी कोणाला आवडत नसते, प्रेमात ही अटच नसते. प्रेमाची स्वत:ची एक भाषा आणि प्रेमात स्वत:च एक जगणं असतं.  जात बघून प्रेमात पडता येत नाही. पण अशा प्रेमाचे लग्नात रुपांतर होताना होणारा संघर्ष आज आधुनिकतेच्या जगातही कायम आहे. हा संघर्ष टाळता येऊच शकणार नाही का? हा महत्वाचा प्रश्न खूप संयत आणि वास्तवदर्शी पद्धतीने या मालिकेतून उलगडत आहे.विशेष म्हणजे प्रगत समजल्या जाणाऱ्या ग्रामीण महाराष्ट्रातले हे अस्वस्थ करणारे वास्तव आहे,पण ते मांडताना कुठलाही फिल्मीपणा टाळून ‘पुढचे पाऊल’ या वास्तवावर एक वेगळा दृष्टीकोन मांडते. मालिका विश्वात दीर्घकाळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अक्कासाहेबांचे हे ‘पुढचे पाऊल’ म्हणूनच वेगळे ठरते आहे.
 
संकटातून मार्ग काढणाऱ्या,प्रश्नांची अचूक उकल करणाऱ्या  अक्कासाहेब,सत्यजित  आणि तेजस्विनीच्या प्रेमकहाणीत नेमकी काय भूमिका घेतात याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. अक्कासाहेबांच्या सरदेशमुख कुटुंबासोबत श्रीकांत देसाई,मयूर खांडगे,आरती मोरे,अमित खेडेकर,संदीप जुवाटकर,नीता वझे,फ्रान्सिस ऑगस्टिन या अभिनयसंपन्न कलाकारांच्या सहभागाने हा कथाभाग विशेष रंगतो आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

हृतिक रोशनच्या पायाला दुखापत,अभिनेता गंभीर अवस्थेत आढळला

संगीतकार अभिजीत मजुमदार यांचे वयाच्या 54 व्या वर्षी निधन

विक्रम भट्ट आणि त्यांच्या मुलीवर कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल

गौरव खन्नाची पत्नी आकांक्षाने बाथरूममधील बोल्ड फोटो शेअर केले, आरशासमोर Curvy Figure दाखवताना

'बॉर्डर २' चित्रपटासाठी वरुण धवनवर टीका करणाऱ्यांना सुनील शेट्टी यांनी फटकारले

सर्व पहा

नवीन

प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी भारतीय चित्रपटसृष्टीचे प्रतिनिधित्व करतील

हृतिक रोशनच्या पायाला दुखापत,अभिनेता गंभीर अवस्थेत आढळला

संगीतकार अभिजीत मजुमदार यांचे वयाच्या 54 व्या वर्षी निधन

विक्रम भट्ट आणि त्यांच्या मुलीवर कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल

Kanakaditya Sun Temple दुर्मिळ आणि जागृत सूर्य मंदिरांपैकी एक कनकादित्य मंदिर रत्नागिरी

पुढील लेख
Show comments