Dharma Sangrah

राधाच्या लग्नात बयोआजी आणणार विघ्न

Webdunia
बुधवार, 21 डिसेंबर 2016 (17:17 IST)
स्टार प्रवाहवरील 'गोठ' मालिकेत येणार महत्त्वाचं वळण
मनमोकळं, मनस्वी जगणारी शिरोडकरांची राधा लग्नाची हळद लावून नवं आयुष्य जगण्याची स्वप्न पहात आहे. मात्र, तिचा कायम तिरस्कार करणारी बयोआजी राधाच्या लग्नात विघ्न आणणार आहे. मात्र, बिनधास्तपणे वावरणारी राधा बयोआजीचं हे कारस्थान हाणून पाडणार का, हे पहाणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

स्टार प्रवाहवरील गोठ ही मालिका आता महत्त्वाच्या टप्प्यावर आली आहे. 'स्त्रियांचे निर्णय स्त्रियांच्या हाती' असा विचार ही मालिका मांडत आहे. मालिका सुरू झाल्यापासूनच प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभतो आहे. सातत्यानं कथानकात येणारी वळणं मालिकेविषयी उत्सुकता निर्माण करत आहेत. मात्र, आता मालिकेला वेगळंच वळण मिळणार असल्याचं चित्र आहे. लग्नाचा साजलेवून  राधा आनंदात असताना बयोआजी म्हापसेकर हे लग्न मोडण्याचा प्रयत्न करत आहे. राधाला त्रास देण्याचे या पूर्वीचे प्रयत्न सफल झालेले नाहीत. सर्वांपुढे राधानं केलेल्या अपमानाचा सूड घेण्यासाठी बयोआजीनं मोठी विचित्र खेळी खेळली आहे. त्यासाठी तिनं अभय म्हापसेकरला हाताशी धरलं आहे.

ज्या अभिषेकशी राधाचं लग्न ठरलं आहे, त्याला फितवण्याचा डाव अभयनं खेळला आहे. त्याच्या या डावाला अभिषेक बळी पडतो का, बयोआजी अपमानाचा बदला घेते का, की सर्वांच्या खेळ्या हाणून पाडत राधाचं लग्न निर्विघ्न पार पडतं हे पहाणं रंजक ठरणार आहे. या आणि पुढच्या आठवड्यात राधाच्या लग्नाचे हे नाट्य घडणार आहे. नीलकांती पाटेकर,राजन भिसे,समीर परांजपे,रुपल नंद, सुशील इनामदार,विवेक गोरे,ऋता काळे,सुप्रिया विनोद,शलाका पवार,लतिका गोरे या कसलेल्या कलावंतांच्या अभिनय जुगलबंदीने स्टार प्रवाहवरील ही मालिका विशेष रंगणार आहे.
 
सर्व पहा

नक्की वाचा

हृतिक रोशनच्या पायाला दुखापत,अभिनेता गंभीर अवस्थेत आढळला

संगीतकार अभिजीत मजुमदार यांचे वयाच्या 54 व्या वर्षी निधन

विक्रम भट्ट आणि त्यांच्या मुलीवर कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल

गौरव खन्नाची पत्नी आकांक्षाने बाथरूममधील बोल्ड फोटो शेअर केले, आरशासमोर Curvy Figure दाखवताना

'बॉर्डर २' चित्रपटासाठी वरुण धवनवर टीका करणाऱ्यांना सुनील शेट्टी यांनी फटकारले

सर्व पहा

नवीन

"धुरंधर" मधील अभिनेत्याने लग्नाचे खोटे आमिष दाखवून आपल्या मोलकरणीवर १० वर्षे बलात्कार केला!

मुंबई मेट्रोमध्ये वरुण धवनने केले पुल-अप्स, अधिकाऱ्यांनी दिला इशारा; व्हिडिओ व्हायरल

सह्याद्री पर्वतरांगेत स्थित नाशिकचा हरिहर किल्ला इतिहासप्रेमी आणि सहसींना आकर्षित करतो

Places to visit on Republic Day प्रजासत्ताक दिन विशेष भेट देण्यासाठी ही ठिकाणे नक्कीच एक्सप्लोर करा

प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी भारतीय चित्रपटसृष्टीचे प्रतिनिधित्व करतील

पुढील लेख
Show comments