Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

काळजाला भिडणारे 'साहवेना अनुराग' संगीतप्रेमींच्या भेटीस

Webdunia
शुक्रवार, 21 जानेवारी 2022 (16:05 IST)
‘पांघरूण' चित्रपटातील गाणे प्रदर्शित
काकस्पर्श, नटसम्राट अशा सर्वोत्कृष्ट कलाकृतीनंतर महेश मांजरेकर आणि झी स्टुडिओज घेऊन येत असलेल्या 'पांघरूण' या चित्रपटातील  'अनोखी गाठ' आणि 'इलुसा हा देह' ही दोन सुरेल गाणी यापूर्वी प्रदर्शित झाली आहेत. या श्रवणीय गाण्यांना संगीतरसिकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाल्यानंतर आता या चित्रपटातील 'साहवेना अनुराग' हे मंत्रमुग्ध करणारे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्याला केतकी माटेगावकर हिचा सुमधुर आवाज लाभला असून या गाण्याचे बोल वैभव जोशी यांचे आहेत तर हितेश मोडक यांनी या गाण्याला संगीतबद्ध केले आहे. 

झी स्टुडिओज आणि महेश मांजरेकर हे एक उत्तम समीकरण आहे आणि त्यातून नेहमीच एक अनोखा कलाविष्कार चित्रपटप्रेमींसाठी सादर होतो. अशीच सुंदर कलाकृती 'पांघरूण'च्या निमित्ताने पाहायला मिळणारा आहे. स्वातंत्र्यपूर्वीचा काळ, कोकणातील नयनरम्य निसर्गसौंदर्य आणि तिथे घडणारी अनोखी प्रेमकहाणी आपल्याला 'पांघरूण' मध्ये पाहायला मिळणार आहे. पुन्हा एक विलक्षण प्रेमकहाणी अशी टॅगलाईन असणाऱ्या या चित्रपटातील 'साहवेना अनुराग' या गाण्याचे बोल थेट काळजाला भिडणारे आहेत. कला आणि प्रतिभेतून आलेला आवेश या गाण्यात चित्रित करण्यात आला आहे. नायिकेच्या मनातील भावना, घालमेल न बोलताही देहबोलीतून व्यक्त होत आहेत. हा सांगितिक खजिना प्रेक्षकांना नक्कीच भावेल. 
 
अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हजेरी लावणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले असून यात अमोल बावडेकर, गौरी इंगवले, रोहित फाळके, विद्याधर जोशी, सुरेखा तळवलकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सुमधुर संगीत, भावनिक कथानक यांमुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा हा चित्रपट ४ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प्रियांका चोप्राच्या 'पानी'चा टीझर लाँच

होंबळे फिल्म्सचा 'बघीरा' चित्रपटगृहांमध्ये या दिवशी खळबळ माजवणार

Ayushmann Khurrana :आयुष्मान अभिनय आणि गायन, कविता लिहिण्याची चांगली आवड ठेवणारा अभिनेता

वडिलांच्या निधनानंतर मलायका अरोराची पहिली पोस्ट, म्हणाली-आमचे कुटुंब धक्क्यात आहे

दीपिका रणवीर एका गोंडस मुलीचे आईबाबा झाले

सर्व पहा

नवीन

Border 2: बॉर्डर 2'चं शूटिंग या दिवसा पासून सुरू होणार!

महालक्ष्मी मंदिर डहाणू

स्त्री 2 ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला

कोकण भ्रमंती : रमणीय स्थळ कुर्ली

कल्ट क्लासिक पडोसन थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित झाला, सायराबानोने शेअर केली पोस्ट

पुढील लेख
Show comments