Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्री छत्रपती उदयनराजे भोसले यांनाही 'भिरकीट'ची भुरळ

Webdunia
मंगळवार, 28 जून 2022 (15:59 IST)
प्रेक्षकांना चित्रपट पाहाण्याचे आवाहन 
हसताहसता मनाला स्पर्शून जाणारा चित्रपट म्हणजे 'भिरकीट'. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात सिनेसृष्टीतील सगळे विनोदवीर आहेत. त्यामुळे हा एक धमाल चित्रपट बनला आहे. मनोरंजनासोबतच एक खूपच महत्वाचा संदेश देणाऱ्या अनुप जगदाळे दिग्दर्शित 'भिरकीट'ला समीक्षकांसह प्रेक्षकांनीही पसंती दर्शवली असून आता यात आणखी एक मोठे नाव सामील झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज श्री छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आपल्या काही निकटवर्तीयांसह 'भिरकीट' हा चित्रपट नुकताच साताऱ्यात पाहिला आणि हा चित्रपट पाहण्यासाठी छत्रपती उदयनराजे भोसले भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक प्रकोष्ट महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पंकज चव्हाण तसेच सुनील काटकर, नितीन चौघुले व दिग्दर्शक अनुप जगदाळे इतर निकटवर्तीय उपस्थित होते. व उदयनराजे यांनी या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले आहे. केवळ कौतुक नाही तर प्रत्येक प्रेक्षकाने हा चित्रपट पाहावा आणि याकरता साताऱ्यातील चित्रपटगृहात या चित्रपटाचे खेळ काही दिवस अजून ठेवावेत, असे आवाहनही यावेळी केले आहे. 
चित्रपटाबद्दल श्री छत्रपती उदयनराजे भोसले म्हणतात, '' माझा काही परिचयाच्या लोकांनी हा 'भिरकीट' पाहिला आणि त्यांच्याकडून आलेल्या चित्रपटाबद्दलच्या प्रतिक्रिया ऐकून चित्रपट पाहण्याची इच्छा अधिकच तीव्र झाली. नुकताच हा चित्रपट पाहिला असून खूपच सुंदर अशी या चित्रपटाची बांधणी केली आहे. 'भिरकीट'मधील प्रत्येक कलाकाराने उत्कृष्ट अभिनय केला आहे. चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखा आपल्या आसपास वावरत असते, हे चित्रपट पाहताना प्रकर्षाने जाणवते. काळासोबत पुढे जाताना माणूस माणुसकी मागे सोडत आहे, हेच खूप उत्तमरित्या यात मांडले आहे. माणुसकी जपण्यासाठी, नाते जपण्यासाठी, प्रेक्षकांनी हा चित्रपट आवर्जून पाहावा.

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

Chitrakoot Mountains आश्चर्यकारक चित्रकूट पर्वत

तारक मेहता फेम अभिनेता गुरुचरण सिंग सोढी विमानतळावरून बेपत्ता, तक्रार दाखल

शेगाव गजानन महाराज मंदिर परिसरातील दर्शनीय स्थळे

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बेबी बंबचे रेखाने घेतले चुंबन, सोशल मीडियावर व्हिडीओ वायरल

Salman Khan Firing Case: सलमानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणातील आरोपींना 29 एप्रिलपर्यंत कोठडी

पुढील लेख
Show comments