Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'सूर सपाटा'चा दिमाखात रंगला ट्रेलर आणि संगीत अनावरण सोहळा

Webdunia
सोमवार, 4 मार्च 2019 (10:29 IST)
लाडे ब्रोज् फिल्म्स प्रा. लि या निर्मितीसंस्थेने आपल्या पहिल्या-वहिल्या 'पेइंग घोस्ट' या चित्रपटाद्वारा मनोरंजनक्षेत्रात यशस्वी षटकार मारला होता आणि आत्ता घेऊन आलेल्या सूर सपाटा' या दुसऱ्या चित्रपटाने सध्या चित्रसृष्टीत उत्सुकता वाढवलेली आहे. गावठी कबड्डीवर आधारित 'सूर सपाटा'मधून एक ना दोन तब्ब्ल २५ हिंदी-मराठी सिनेसृष्टीतील दिग्ग्ज कलाकारांची मांदियाळी रसिकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहे. 'सूर सपाटा' 21 मार्चला होळीच्या निमीत्ताने संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या मातीतल्या खेळाची आठवण करून देणार असून तत्पूर्वी मंगेश कंठाळे दिग्दर्शित 'सूर सपाटा'ची खास झलक काल आयोजित करण्यात आलेल्या दिमाखदार ट्रेलर आणि संगीत अनावरण सोहळा दरम्यान पाहता आली. अर्जुन पुरस्कार विजेते कबड्डीपटू शकुंतला खटावकर,माया अकरे मेहेर आणि शिव छत्रपती पुरस्कार शैला रायकर, ठाकरे चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजीत पानसे सूर सपाटा'ची संपूर्ण टीम यांच्या हस्ते 'सूर सपाटा'चा उत्कंठावर्धक ट्रेलर आणि संगीत अनावरण सोहळा करण्यात आला.
 
सध्या सर्वत्र चर्चा आहे ती या चित्रपटातील कलाकारांची. या गुलदस्त्यातील सर्व नावं समोर आली असून हिंदीतील सुप्रसिद्ध अभिनेते गोविंद नामदेव, दिग्दर्शक-सिनेमॅटोग्राफर संजय जाधव, उपेंद्र लिमये, प्रविण तरडे, आनंद इंगळे, संजय झाडबुके, अभिज्ञा भावे, नेहा शितोळे याची वर्णी लागली आहे. 'सूर सपाटा'च्या ट्रेलर लॉण्चच्या दिमाखदार सोहळ्याप्रसंगी ही सर्व  मंडळी आवर्जून उपस्थित राहिली हे विशेष. शिवाय हिंदी-मराठी  सिनेसृष्टीतील अनेक मान्यवर व 'सूर सपाटा'ची संपूर्ण टीम  उपस्थित होती.
 
उनाड पण कुशल विद्यार्थ्यांभोवती गुंफलेली 'सूर सपाटा'ची कथा प्रेक्षकांची उत्कंठा टप्प्या-टप्प्याने वाढवत राहते. जिल्हा परिषदेच्या शाळेतील काही सामान्य विद्यार्थ्यांतील असामान्य कौशल्य जाणून त्यांना स्पर्धेमध्ये उतरवू पाहणारे शिक्षक एकीकडे तर आपणही एखादं मैदान मारू शकतो याची जाणीव झालेले विद्यार्थी दुसरीकडे. या दोघांमधला सुवर्णमध्य साधणारा 'सूर सपाटा' प्रत्येकाला आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याची एक संधी मिळाली तर तो त्याचं कसं सोनं करू शकतो हे दाखवतो.
 
इगल आय एन्टरटेन्मेन्टचे प्रकाश नाथन, हिमांशू अशर, संजय पतौडीया, अरशद खान प्रस्तुत आणि किशोर खिल्लारे, सुभाष गुप्ता, सतीश गुप्ता आणि जगदीश लाडे सहनिर्मित 'सूर सपाटा'मध्ये राष्ट्रीय पुरस्कार विजेता बाल कलाकार हंसराज जगताप, यश कुलकर्णी, चिन्मय संत, चिन्मय पटवर्धन, रुपेश बने, जीवन कळारकर, सुयश शिर्के, शरयू सोनावणे, निनाद तांबडे यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. या चित्रपटाची कथा मंगेश कंठाळे यांची असून पटकथा मंगेश कंठाळे व अमित बैचे यांची आहे. तर संवादलेखन अमित बैचे यांनीच केले आहे. 'सूर सपाटा'मध्ये वेगवेगळ्या जॉनरची धमाकेदार गाणी आहेत. त्यातील आदर्श शिंदे आणि प्रियांका बर्वेच्या आवाजातील 'रंग भारी रे रंगणार' हे जोशपूर्ण गाणं अलिकडेच सोशल प्लॅटफॉर्मवर आऊट करण्यात आलंय ज्याला प्रेक्षकांच्या पसंतीची पावती सुद्धा लाभली आहे. याशिवाय अभिजीत सावंत यांनी गायलेलं 'खेळ दैवाचे' आणि जसराज जोशी व अभिनय जगतापच्या आवाजातील 'सूर सपाटा'चे टायटल ट्रॅक अतिशय उत्तम झालं आहे. या गाण्यांना अभिनय जगताप यांनी संगीतबद्ध केले आहे तर ही गीते मंगेश कांगणे आणि स्वप्निल चाफेकर यांनी लिहीली आहेत. या चित्रपटाचा कॅनव्हास सिनेमॅटोग्राफर विजय मिश्रा यांच्या लेन्समधून चित्रित करण्यात आला असून अभिनय जगतापचे श्रवणीय संगीत चित्रपटाला लाभले आहे.

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

पुढील लेख
Show comments