Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लज्जतदार नात्यांची चटकदार गोष्ट मनोरंजनाची चवदार ‘पाणीपुरी’ चित्रपटगृहात

Webdunia
सोमवार, 16 सप्टेंबर 2024 (18:03 IST)
झणझणीत, तिखट, कुरकुरीत, आंबट-गोड पदार्थ म्हटलं की, पाणीपुरीच आपल्या नजरेसमोर येते. पाणीपुरी म्हटलं की, प्रत्येकाच्या तोंडाला लगेच पाणी सुटतं आणि मनालाही ते खाण्याचा मोह होतो. नात्यांच्या अशाच वेगवेगळ्या चवींची चटकदार पाणीपुरी लवकरच चित्रपटगृहात आपल्याला चाखायला मिळणार आहे.

एस. के प्रॉडक्शन निर्मित आणि रमेश चौधरी यांचे लेखन-दिग्दर्शन असलेला ‘पाणीपुरी’ हा मराठी चित्रपट येत्या 15 नोव्हेंबरला चित्रपटगृहात दाखल होणार आहे. संजीवकुमार अग्रवाल या चित्रपटाचे निर्माते आहेत तर सहनिर्माते चंद्रकांत ठक्कर, अनिकेत अग्रवाल आहेत.  
 
प्रत्येक नात्याची स्वतःची एक गोष्ट असते.. कधी खूप आनंद, प्रेम, विश्वास देणारी तर कधी सोबत दुःख घेऊन येणारी..अशाच लज्जतदार नात्यांची चटकदार गोष्ट घेऊन ‘पाणीपुरी’ हा चित्रपट आपलं मनोरंजन करणार आहे. मकरंद देशपांडे, सायली संजीव, ऋषिकेश जोशी, विशाखा सुभेदार, भारत गणेशपुरे, प्राजक्ता हनमघर, कैलास वाघमारे, शिवाली परब, प्रतिक्षा जाधव, सचिन बांगर, अनुष्का पिंपुटकर, अभय गिते आदि कलाकार मंडळी आपल्या मनोरंजनातून  ‘पाणीपुरी’ची चव आपल्याला  चाखायला देणार आहेत.  
 
चित्रपटाचे छायांकन आणि संकलन सिद्धेश संतोष मोरे यांचे आहे. चित्रपटाची पटकथा-संवाद संजय नवगिरे यांनी  लिहिले आहेत. संगीत अजित परब तर पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे.  गीतकार मंदार चोळकर यांच्या  गीतांना  गायक मंदार आपटे, अजित परब  यांचे  स्वर लाभले आहेत.  
मनोरंजनाची ही चटकदार ‘पाणीपुरी’ १५ नोव्हेंबरला चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मी स्वतःला बाथरूममध्ये बंद करून खूप रडायचो ,शाहरुख खान अपयशावर बोलले

War 2 :हृतिक रोशनच्या 'वॉर 2 मध्ये या प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री!

Baaghi 4: बागी 4' चा फर्स्ट लूक आऊट, चित्रपट या दिवशी रिलीज होणार

चित्रपटातील प्रसिद्ध खलनायकाचे निधन, या चित्रपटात शेवटचे दिसले होते

अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2: द रुलचा धमाकेदार ट्रेलर रिलीज

सर्व पहा

नवीन

माझी बायको हरवलीय...

मी सांगून सांगून थकले !

चित्रपटातील प्रसिद्ध खलनायकाचे निधन, या चित्रपटात शेवटचे दिसले होते

भारतातील चार प्रसिद्ध स्कुबा डायव्हिंग स्थळे

बायकोचं अर्ध डोकं दुखतं

पुढील लेख
Show comments