Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’नितीन गडकरी यांचा जीवनप्रवास लवकरच पडद्यावर

Webdunia
शनिवार, 7 ऑक्टोबर 2023 (14:57 IST)
‘गडकरी’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित नितीन गडकरी… देशाच्या राजकारणातील एक मोठे नाव. भारतातील रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वाधिक काळ काम करणाऱ्या नितीन गडकरी यांची ओळख ‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’ अशीही आहे. देशाच्या विकासासाठी कायमच कटिबद्ध असणाऱ्या नितीन गडकरी यांच्या आयुष्यावर आधारित ‘गडकरी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच या चित्रपटाचे टिझर पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. अभिजीत मजुमदार प्रस्तुत, अक्षय देशमुख फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे अक्षय अनंत देशमुख निर्माते आहेत. तर या चित्रपटाचे कथा, पटकथा आणि दिग्दर्शन अनुराग राजन भुसारी यांनी केले आहे.

‘गडकरी’मध्ये नितीन गडकरींची भूमिका कोण साकारेल? या प्रमुख भूमिकेत कोण पाहायला मिळेल यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली असून लवकरच याचा खुलासा होणार आहे. चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अनुराग भुसारी म्हणतात, ‘’ नितीन गडकरी यांची राजकारणातील कारकिर्द निश्चितच उल्लेखनीय आहे. अभ्यासू, प्रभावी वक्ता, कणखर, निरपेक्ष विचार करणारा नेता, रस्ता सुधारणा प्रवर्तक. त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या या विविध बाजू जनतेला माहितच आहेत. समाज कल्याणाचा ध्यास असणाऱ्या या नेत्याचा राजकारणातील प्रवास तसा अनेकांना माहित आहे. मात्र त्यांचे वैयक्तिक आयुष्य व तरुण काळ तितकाच रंजक आहे. अशा या नेत्याचा जीवनप्रवास प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.’’ २७ ॲाक्टोबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे अनुराग भुसारी, मिहिर फाटे सहनिर्माते आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अभिनेत्री रती अग्निहोत्री बनली आजी, मुलगा तनुज विरवानी बनला बाबा

उर्मिला मातोंडकरच्या घटस्फोटाचे कारण काय? 8 वर्षांनंतर पतीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला

ज्येष्ठ तेलुगू सुपरस्टार चिरंजीवी यांना गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कार मिळाला

सैफ अली खान आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​'रेस 4' मध्ये एकत्र काम करणार!

कमल हसनचा मणिरत्नम दिग्दर्शित 'ठग लाइफ' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण

सर्व पहा

नवीन

हॅरी पॉटर फेम अभिनेत्री 'डेम मॅगी स्मिथ' यांचे निधन

Lata Mangeshkar Birthday : लता मंगेशकरबद्दल 20 रोचक तथ्य

बिगबॉस मराठी मध्ये राखी सावंतची जोरदार एंट्री!

Bhool Bhulaiyaa 3: कार्तिक आर्यन आणि तृप्ती डिमरी यांचा आगामी चित्रपट 'भूल भुलैया 3' चा टीझर रिलीज

भारतातील पाच प्रसिद्ध दुर्गा मंदिर

पुढील लेख
Show comments